शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वळीवाच्या पावसाने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात गेली तीन-चार दिवसांपासून रोज वळीवाच्या पावसाची हजेरी आहे. त्यामुळे परिपक्व झालेले सूर्यफूल व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात गेली तीन-चार दिवसांपासून रोज वळीवाच्या पावसाची हजेरी आहे. त्यामुळे परिपक्व झालेले सूर्यफूल व भुईमुगाची काढणी खोळंबली आहे. हा पाऊस उसाला पोषक असला तरी भाजीपाल्यासह इतर पिकांना मारक ठरत आहे.

यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन होईल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे उन्हाळी पिके काढून खरिपासाठी जमीन तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. उन्हाळी भात, भुईमूग, सूर्यफूल काढणीस आले आहे. या पिकांची वेळेत काढणी झाली तर ते वाळवून ठेवणे अधिक सोपे जाते. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून रोज वळीव पाऊस हजेरी लावत आहे. पडेल तिथे पडेल असा पाऊस असला तरी जिथे पडेल तिथे पाणी पाणी करत आहे. त्यामुळे शिवारात पाणीच पाणी तुंबले आहे. हाताताेंडाला आलेली पिके काढायची कशी? या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. कोथंबीर, मेथी, पोकळा यासह फळभाज्यांचे पावसाने मोठे नुकसान केले आहे. पाऊस त्यात ढगाळ वातावरण असल्याने भाजीपाल्यावर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. वीट व्यावसायिकांचे तर पावसाने कंबरडे मोडले आहे.

दरम्यान, रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. तापमानात घट झाली असून किमान २४ तर कमाल ३५ डिग्रीपर्यंत राहिले आहे. आज, सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

असे राहील तापमान, डिग्रीमध्ये-

वार किमान कमाल वातावरण

सोमवार २५ ३४ ढगाळ, पाऊस

मंगळवार २३ ३४ ढगाळ नंतर स्वच्छ

बुधवार २२ ३६ स्वच्छ

गुरुवार २२ ३५ स्वच्छ