शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

पाचट ठेवण्यास शेतकऱ्यांची अजूनही अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:36 IST

शेतीसाठी एक-आड सरी पाचट ठेवल्याने शेतीसाठी दोन-तीन टन एकरी सेंद्रिय खत प्राप्त होते. त्याचबरोबर पाण्याची व भांगलणीची ५० टक्के ...

शेतीसाठी एक-आड सरी पाचट ठेवल्याने शेतीसाठी दोन-तीन टन एकरी सेंद्रिय खत प्राप्त होते. त्याचबरोबर पाण्याची व भांगलणीची ५० टक्के बचत होते. जमिनीमध्ये गारवा निर्माण होऊन पीक वाढीसाठी वातावरण अनुकूल होते. तणासाठी मजुरी, भरणी यामध्ये वेळ व पैसा या दोन्हीची बचत होते. तरीही शेतकऱ्यांमध्ये

असणारे अज्ञान या पाचट ठेवण्यास फाटा देत आहे. उसामध्ये पाचट ठेवल्यास

उंदीर निर्माण होतात, पाला कुजत नाही. यासारखे गैरसमजाने शेतकऱ्यांमध्ये

न्यूनगंड निर्माण केले आहेत, तर उंदरामुळे पाल्यामध्ये साप येतात. यासारखी कारणे शेतकऱ्यांमधून सांगितली जातात. त्यामुळे ऊस तोडल्याबरोबर शेतकऱ्यांमध्ये कृषी खात्याने मार्गदर्शन व पाचट ठेवण्याचे फायदे

सांगूनही शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. चार वर्षांपूर्वी दुष्काळाच्या खाईत महाराष्ट्र लोटला होता त्यावेळी पाण्याचा जास्त वापर करणारे ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्यामुळे

शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनाबरोबरच पाचट ठेवण्यास आवश्यकता आहे. शासनाबरोबरच काही साखर कारखान्यांनी पाचट ठेवण्यास व ठिबक सिंचनास अनुदान जाहीर केले होते. त्यामुळे शेतामध्ये पाचट ठेवणे

शेतकऱ्यांसाठी फायदेशीरच आहे.

कोट.....

शेतकऱ्यांनी पाचट ठेवणे शेतीसाठी उपयुक्त

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाचट ठेवणे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असून,

त्यामुळे शेतातील जमिनीमध्ये विविध सेंद्रिय घटक निर्माण होऊन जमिनीची

सुपीकता होणार आहे. त्यामुळे याकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे

आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रबोधन करीत आहे. त्याचा फायदा

शेतकऱ्यांना पटवून सांगितला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने

शेती करणे सोडून आधुनिक शेती ‘व्यवसाय’ म्हणून करणे गरजेचा आहे.

- करुणा कांबळे (कृषी सहाय्यक असळज, ता. गगनबावडा)