भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:28 IST2021-09-15T04:28:05+5:302021-09-15T04:28:05+5:30

तालुक्यातील चंदगड, कानूर, अडकूर, नागणवाडी, शिरगाव, हेरे, कळसगादे, पार्ले, पाटणे, जंगमहट्टी, कलिवडे, तावरेवाडी, मजरे कारवे, मौजे कारवे, तुर्केवाडी, ...

Farewell to Bappa in a devotional atmosphere | भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप

भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप

तालुक्यातील चंदगड, कानूर, अडकूर, नागणवाडी, शिरगाव, हेरे, कळसगादे, पार्ले, पाटणे, जंगमहट्टी, कलिवडे, तावरेवाडी, मजरे कारवे, मौजे कारवे, तुर्केवाडी, तडशिनहाळ, तुडये, माडवळे, शिनोळी, कोवाड, कालकुंद्री, कागणी, कुदनूर, करंजगाव या गावांसह सर्वच गावात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.

पाणी प्रदूषण टाळण्यासाठी अनेक ठिकाणी निर्माल्य विसर्जन न करता ते एकत्र केले तर अनेकांनी श्रीं’चे पाण्यात विसर्जन न करता मूर्तीदान करून वेगळा संदेश दिला.

मंगळवारी माहेरवाशीण जात नाही या भावनेपोटी गौरीचे विसर्जन मंगळवारी होत नाही म्हणून अनेकजण संभ्रमात होते. पण मंगळवारीच गणेशमूर्ती विसर्जनाचा योग्य आल्याने शेवटी गणरायाला निरोप दिला. मंगळवारी भक्तिमय वातावरणात मजरे कारवे येथे घरगुती गणेशमूर्तींंचे विसर्जन करण्यात आले.

फोटो ओळी : चंदगड तालुक्यात ‘श्रीं’ची विसर्जन करताना भाविक.

क्रमांक : १४०९२०२१-गड-०८

Web Title: Farewell to Bappa in a devotional atmosphere