विश्वास कारखान्याच्या साखरेची इराणमध्ये निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:11 IST2021-02-20T05:11:16+5:302021-02-20T05:11:16+5:30

चिखली (ता. शिराळा) : येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात हंगाम २०२०-२१ मध्ये उत्पादित केलेली कच्ची साखर शुक्रवारपासून ...

Factory sugar exports to Iran | विश्वास कारखान्याच्या साखरेची इराणमध्ये निर्यात

विश्वास कारखान्याच्या साखरेची इराणमध्ये निर्यात

चिखली (ता. शिराळा) : येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात हंगाम २०२०-२१ मध्ये उत्पादित केलेली कच्ची साखर शुक्रवारपासून इराण देशात निर्यातीस प्रारंभ झाला. कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांनी श्रीफळ फोडून निर्यातीकरिता निघालेल्या पहिल्या ट्रकचे पूजन केले. एकूण १ लाख २५ हजार ८५० क्विंटल साखर के. एन. रिसोर्सेस, मुंबई यांच्यामार्फत परदेशात निर्यात होणार आहे. यावेळी युवा नेते विराज नाईक, संचालक दिनकरराव पाटील, मानसिंग पाटील, बाळासाहेब पाटील, विष्णू पाटील, शिवाजी पाटील, दत्तात्रय राणे, सुरेश पाटील, संभाजी पाटील, तानाजी वनारे, विश्वास पाटील, विश्वास कदम, बिरुदेव आमरे, भीमराव गायकवाड, दत्तात्रय पाटील, शामराव मोहिते, कार्यकारी संचालक राम पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळी :

चिखली येथे विश्वास साखर कारखान्याच्या इराण येथे निर्यात होणाऱ्या साखरेच्या ट्रक पूजनाप्रसंगी आमदार मानसिंगराव नाईक , माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Factory sugar exports to Iran