शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीवरील अशासकीय मंडळाला ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 12:26 IST

Market Kolhapur- कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरील अशासकीय मंडळाला आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याला बाजार समित्यावगळता उर्वरीत सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम असल्याचे कारण दिले आहे. त्यामुळे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील अशासकीय मंडळ ४ ऑगस्ट २०२१ पर्यंत कायम राहणार आहे.

ठळक मुद्देबाजार समितीवरील अशासकीय मंडळाला ऑगस्टपर्यंत मुदतवाढ राज्य शासनाचा निर्णय : सहा महिन्यांचा वाढीव कार्यकाल मिळणार

कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरील अशासकीय मंडळाला आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याला बाजार समित्यावगळता उर्वरीत सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम असल्याचे कारण दिले आहे. त्यामुळे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील अशासकीय मंडळ ४ ऑगस्ट २०२१ पर्यंत कायम राहणार आहे.

भ्रष्टाचार चौकशी अहवालानंतर विद्यमान संचालक मंडळाने राजीनामा दिल्यानंतर आणि कोरोनाकाळ सुरू असल्याने पंचवार्षिक निवडणुका घेत नसल्याचे सांगत राज्याच्या पणन विभागाने कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती. ४ फेब्रुवारीला या मंडळाची मुदत संपल्याने पुढे काय होणार याविषयी उत्सुकता होती.बाजार समितीच्या निवडणुका जानेवारी २०२१ च्या आदेशानुसार पुढील तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान, याच कालावधीत सहकाराशी संबंधित कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या निवडणूका घेण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे मुदतवाढ देण्याबाबतचा मागणी करणारा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांच्यामार्फत पणन विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार शासनाने सर्व कारणांचा विचार करत मुदतवाढ देणेच आजच्या घडीला सोयीचे ठरणार असल्याचे सांगत राज्य शासनाने कार्यासन अधिकारी जयंत भोईर याच्याकरवी मुदतवाढीचे लेखी आदेश काढले आहेत.

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर