कोल्हापूर : येथील प्रायव्हेट हायस्कूलची विद्यार्थिनी स्नेहा नागेश हंकारे (आठवी) व शेलाजी वन्नाजी संघवी विद्यालयाचा विद्यार्थी सोहन नागेश हंकारे (तिसरी) या भावंडानी लॉकडाऊन काळामध्ये १४०हून जास्त निसर्गचित्र तयार केली आहेत. या निसर्गचित्रांचे प्रदर्शन छत्रपती शाहू स्मारक भवन आर्ट गॅलरीमध्ये दिनांक २४ ते ३० जानेवारी या कालावधीत होणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी चंद्रकांत जोशी असणार आहेत. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, उद्योजक राहुल बुधले, डॉ. मिलिंद सामानगडकर, आंतरभारती शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्ष पल्लवी कोरगांवकर, प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मदन कुलकर्णी व शिक्षक नेते दादा लाड उपस्थित राहणार आहे. या प्रदर्शनात ४० निसर्गचित्रे मांडण्यात येणार असून, त्यांची विक्रीही केली जाणार आहे. यातून मिळालेली ७५ टक्के रक्कम वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व कोविड लस खरेदी करून मदत म्हणून दिली जाणार आहे.
---
फोटो नं २००१२०२१-कोल-चित्रप्रदर्शन
--