शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय चित्रकारांच्या चित्रप्रतींचे उद्यापासून प्रदर्शन

By admin | Updated: November 14, 2014 23:57 IST

कोल्हापूरकरांना पर्वणी : पुण्यातील ‘ड्रीम अ पेंटिंग’ या संस्थेचा उपक्रम

कोल्हापूर : पुण्यातील ‘ड्रीम अ पेंटिंग’ या संस्थेतर्फे रविवार (दि. १६) पासून जगभरात गाजलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रकारांच्या दुर्मीळ चित्रप्रतींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अमोद भट यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, शाहू स्मारक भवनच्या कलादालनात होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर यांच्या हस्ते होईल. या प्रदर्शनात व्हॅनगॉग, क्लॉद मोने, लिओ नार्दोे दि विंची, पिसारो, देगास आणि क्लीसारख्या जगप्रसिद्ध चित्रकारांची इतिहास-पूर्व गुंफाचित्रे, स्थिरवस्तू चित्रण, विख्यात चित्रकारांची उत्तम निसर्गचित्रे आणि समुद्रचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत. दुर्मीळ चित्रांच्या हुबेहूब दिसणाऱ्या प्रतिकृती, पूर्वपरवानगीनुसार मूळ चित्रातील सर्व वैशिष्ट्य जसे स्ट्रोक्स, रेषा, रंगसंगती आणि हावभाव कुठेही न बदलता, कॅनव्हासवर डच तंत्रज्ञांनी विकसित केलेल्या तंत्राद्वारे छापल्या आहेत. या प्रदर्शनातील चित्रांच्या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेपैकी १५ टक्के निधी हा बालकल्याण संकुल संस्थेला देण्यात येणार आहे. तरी रसिकांनी रविवारपासून २१ नोव्हेंबरपर्यंत सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुरू राहणाऱ्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेस जी. एस. माजगावकर उपस्थित होते. प्रदर्शनांतर्गत उदयोन्मुख चित्रकारांसाठी गुरुवारी (दि. २०) ‘द करंट युरोपियन आर्ट मार्केट अँड हाऊ टू गेट इन’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ब्रिटिश कलाकारांच्या उन्नतीसाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या आणि क्युरेटर असणाऱ्या कॅथरिना या कोल्हापुरातील चित्रकारांना आपली कला युरोपातील बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी लागणाऱ्या कार्यप्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.