जयंती नाल्यावरील पुलावरच चक्क खुदाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:24+5:302021-01-20T04:25:24+5:30

राज्य शासनाच्या महानेट कंपनीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, सीपीआर आणि कोल्हापूर महापालिका अशी हायस्पीड इंटरनेट कनेकश्नने जोडले जाणार आहे. या कार्यालयातील ...

Excavation on the bridge over Jayanti Nala | जयंती नाल्यावरील पुलावरच चक्क खुदाई

जयंती नाल्यावरील पुलावरच चक्क खुदाई

राज्य शासनाच्या महानेट कंपनीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, सीपीआर आणि कोल्हापूर महापालिका अशी हायस्पीड इंटरनेट कनेकश्नने जोडले जाणार आहे. या कार्यालयातील संगणकीय कामकाजाला गती मिळणार आहे. कंपनीकडून केबल टाकण्याचे काम सुरू झाले आहे. सोमवारी जयंती नाला येथील पुलाजवळ काम आले असता, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी चक्क पुलावरच खुदाई करून केबल टाकली. यामुळे पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. वास्तविक हा पूल हेरिटेज यादीत आहे. येथे खुदाई सोडाच नवीन कोणतेच काम करता येत नाही. असे असतानाही पुलाला धोका निर्माण होईल, असे खुदाईचे काम कंपनीने केले.

प्रतिक्रिया

संबंधित कंपनीने पुलाला धोका निर्माण होईल, अशी खुदाई केली आहे. त्यांना तातडीने केबल काढून घेऊन आज, बुधवारी सकाळी खुदाई केलेल्या परिसरावर काँक्रीट करण्याचे आदेश दिले आहेत. महावितरण कंपनीकडून ज्याप्रमाणे पुलाच्या बाहेरील बाजूने केबल टाकली आहे, त्याप्रमाणे केबल कंपनीलाही टाकण्याच्या सूचना केल्या आहेत.

नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, महापालिका

चौकट

कनिष्ठ अभियंत्याला नोटीस

केबल टाकण्याच्या कामावर देखरेखची जबाबदारी असणाऱ्या महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता महानंदा सूर्यवंशी यांनाही शहर अभियंता सरनोबत यांनी धारेवर धरले. याकडे दुर्लक्ष केल्यावरून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.

फाेटो : १९०१२०२१ कोल केएमसी जयंती नाला न्यूज

ओळी : कोल्हापुरातील जयंती नाल्यावरील पुलावरच केबल टाकण्यासाठी खुदाई करण्याचा प्रकार मंगळवारी झाला. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी वेळीच तेथे येवून पाहणी करत कर्मचारी आणि कनिष्ठ अभियंता यांना धारेवर धरले.

छाया : दीपक जाधव

Web Title: Excavation on the bridge over Jayanti Nala