शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीच्या अडीच लाख विद्यार्थ्यांची परीक्षा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कोल्हापूर विभागातील दहावी, बारावीच्या एकूण २ लाख ५९ ...

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कोल्हापूर विभागातील दहावी, बारावीच्या एकूण २ लाख ५९ हजार ६२८ विद्यार्थ्यांची परीक्षा लांबणीवर पडणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याबाबतच्या सरकारच्या निर्णयावर विद्यार्थी, पालकांतून संमिश्र प्रतिक्रिया सोमवारी व्यक्त झाल्या.

कोरोनामुळे शासनाने इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द केली. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांचे काय होणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागून राहिले होते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्यानुसार बारावीची परीक्षा दि. २३ एप्रिल ते दि. २१ मेदरम्यान, तर दहावीची परीक्षा दि. २९ एप्रिल ते दि. २० मे या कालावधीत होणार होती. त्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण २,५९,६२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सध्या शाळा, महाविद्यालयांमध्ये सराव परीक्षा सुरू होत्या. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी दुपारी जाहीर केला. या निर्णयानुसार आता बारावीची परीक्षा मे अखेरीस, तर दहावीची परीक्षा जूनमध्ये होणार आहे.

विद्यार्थी म्हणतात?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी हिताच्यादृष्टीने सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. आधी ऑनलाइन, मग ऑफलाइन असे आमचे दहावीचे शिक्षण झाले आहे. परीक्षा पुढे गेल्याने अभ्यासाला आणखी वेळ मिळाला आहे.

-पूर्वा मोहिते, कसबा बावडा.

बारावीची परीक्षा लांबणीवर पडल्याने आमच्या शिक्षण आणि पुढील सर्व नियोजनावर परिणाम होणार आहे. परीक्षा आता झाली असती, तर बरे झाले असते. पण, कोरोनामुळे शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे.

-फैज सय्यद, बोंद्रेनगर.

पालक म्हणतात?

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने सध्याचा निर्णय योग्य आहे. सरकारने पुन्हा परीक्षा पुढे ढकलू नयेत. आता ठरल्यानुसार जूनमध्ये परीक्षा घ्यावी.

-रेश्मा पठाण, शाहुपुरी.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करता एप्रिल, मे मध्ये परीक्षा होणे आवश्यक होते. मात्र, कोरोना पुन्हा वाढू लागल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.

-महादेव पाटील, शिरोली.

चौकट

बारावीची प्रवेशपत्र नव्याने मिळणार

महाविद्यालयांकडून बारावीच्या काही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे मिळाली आहेत. आता मे अखेरीस ही परीक्षा होणार असल्याने या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे बदलून मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना सध्या प्रवेशपत्रे मिळाली आहेत. त्यांना ती महाविद्यालयात जमा करावी लागणार आहेत. दरम्यान, याबाबत शासन आदेशानुसार कार्यवाही केली जाईल, असे कोल्हापूर विभागीय सचिव देवीदास कुलाळ यांनी सांगितले.

कोल्हापूर विभागातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

दहावीचे विद्यार्थी : १३८४५९

बारावीची विद्यार्थी : १२११६९