शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाच्या सानिध्यातून मनुष्याची उत्क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST

कोल्हापूर : मनुष्याची उत्क्रांती निसर्गाच्या सानिध्यातच झाली आहे. त्यामुळेच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली असून ती माणसाची सहज प्रवृत्ती आहेए ...

कोल्हापूर : मनुष्याची उत्क्रांती निसर्गाच्या सानिध्यातच झाली आहे. त्यामुळेच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली असून ती माणसाची सहज प्रवृत्ती आहेए असे मत युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सलीम मुल्ला यांनी व्यक्त केले. करवीरनगर वाचन मंदिर येथे थोर साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत मुल्ला यांच्याशी अरण्यरंगतून डाॅ. अमर अडके यांनी सुसंवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डाॅ. नंदकुमार जोशी होते.

मुल्ला म्हणाले, अरण्याच्या वाटेवर जाताना प्रत्येक गोष्ट नवी अनुभूती देणारी व मनाला आनंद देणारी आहे. त्यासोबतच हुलकावणी देणारी आहे. येथील जैवविविधता निसर्गाशी एकरूप असते. त्याची अनुभूती अरण्यात फिरल्याशिवाय कळत नाही. अनेकदा एक वन्यप्राणी जीव वाचविण्यासाठी, तर दुसरा वन्यजीव त्याचा जीव घेण्यासाठी आक्रमक होतात. निसर्गाच्या चक्राप्रमाणे अरण्यातील अनुभूती असते. सुंदर दिसणारी फुलपाखरेही अनेकदा विषारी असतात. कारण काही वनस्पतींवर त्यांच्या अळ्या किंवा अंडकोष तयार करतात. त्याचा परिणाम त्यांचे शरीर विष निर्मिती करते. निसर्गामध्ये अगम्य गोष्टी ईश्वराने निर्माण केल्या आहेत. प्रत्येक जीव परजीवावर अवलंबित आहे. हे अरण्यातील चक्र एकमेकांवर आधारित आहे. अनेकदा पक्षीही स्वसंरक्षणासाठी वेगवेगळ्या पक्ष्यांच्या घरट्याचा आधार घेतात. जंगलातून येणारा आवाजांचा उलगडाही मुल्ला यांनी अनेक किस्से सांगून या सुसंवादातून केला. परिचय संस्थेचे संचालक उदय सांगवडेकर यांनी, तर सूत्रसंचालन मनीषा शेणई यांनी केले. अश्विनी वळिवडेकर यांनी आभार मानले.

फोटो : २००१२०२१-कोल- करवीर नगर

ओळी : कोल्हापुरातील करवीरनगर वाचन मंदिरात सुरु असलेल्या वि. स. खांडेकर स्मृती व्याख्यानमालेत गुरुवारी दुसरे पुष्पा गुंफताना युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सलीम मुल्ला यांनी अरण्यरंगतून संवाद साधला. यावेळी डाॅ. अमर अडके उपस्थित होते.