Kolhapur: एसआयटी नेमली तरी बेपत्ता माजी सरपंच पिळणकर यांच्या तपासाला गती येईना, पुरावे नष्ट होण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:06 IST2026-03-17T13:06:17+5:302026-03-17T13:06:44+5:30

सव्वादोन महिन्यांनी पुन्हा तपास

Even if an SIT is appointed the investigation into the missing former Sarpanch Pilankar will not accelerate, there is a risk of evidence being destroyed | Kolhapur: एसआयटी नेमली तरी बेपत्ता माजी सरपंच पिळणकर यांच्या तपासाला गती येईना, पुरावे नष्ट होण्याचा धोका

Kolhapur: एसआयटी नेमली तरी बेपत्ता माजी सरपंच पिळणकर यांच्या तपासाला गती येईना, पुरावे नष्ट होण्याचा धोका

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील पाटगावचे बेपत्ता माजी सरपंच महेश पिळणकर यांचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी एसआयटी तयार करून आठवडा उलटला. अजूनही पिळणकर यांच्या तपासाला गती आलेली नाही. एसआयटी प्रमुखांकडून आधीच्या तपासाचा आढावा घेणे सुरू आहे. पिळणकर बेपत्ता होऊन सव्वादोन महिने उलटले आहेत. आणखी विलंब झाल्यास पुरावे नष्ट होण्याचा धोका त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त केला जात आहे.

माजी सरपंच पिळणकर हे ७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी त्यांच्या घरातून बाहेर पडले होते. गावापासून काही अंतरावर जंगलात त्यांची दुचाकी गावकऱ्यांना आढळली. मात्र, त्यांचा मोबाइल मिळाला नाही. झटापट झाल्याचे काही पुरावे परिसरात मिळाले नाहीत. जंगली श्वापदांचा हल्ला झाल्याचाही मागमूस नाही. पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांमधूनही काही ठोस हाती लागले नाही. त्यामुळे महेश पिळणकरांचे नेमके काय झाले? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एसआयटीकडून तपास गतिमान होईल, असा विश्वास पोलिस अधीक्षकांनी व्यक्त केला आहे. मात्र, पहिला आठवडा केवळ आधीच्या तपासाचा आढावा घेण्यात गेला. गडहिंग्लज उपविभागाचे उपअधीक्षक रामदास इंगवले यांनी भुदरगड पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून गेल्या दोन महिन्यांतील तपासाचा आढावा घेतला.

घटनास्थळाचे पंचनामे, नातेवाइक, साक्षीदारांचे जबाब, जंगलात मिळालेली राख आणि काही अवशेषांचे फॉरेन्सिक अहवाल, पिळणकर यांच्या कॉल डिटेल्सची माहिती इंगवले यांनी घेतली आहे. मिळालेल्या माहितीची पडताळणी सुरू असून, लवकरच तपासाला गती येईल, असे उपअधीक्षक इंगवले यांनी सांगितले.

सव्वादोन महिन्यांनी पुन्हा तपास

पिळणकर बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल होताच भुदरगड पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पाटगावच्या जंगलात आठवडाभर तळ ठोकला होता. पिळणकर यांच्या संपर्कातील काही व्यक्तींकडे चौकशी केली. काही संशयित व्यक्तींवर पाळत ठेवली. पाच ते सात जानेवारी दरम्यान त्यांच्या मोबाइलवर कॉल केलेल्या व्यक्तींना बोलावून बोलावून चौकशी केली. तरीही पोलिसांच्या हाती काही लागले नाही. आता दोन महिन्यांनी पुन्हा तपासाला सुरुवात झाली आहे.

पुरावे सांभाळा

पोलिसांनी जंगलातून गोळा केलेली राख आणि एक दात तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे दिला होता. मात्र, त्याचा अहवाल अस्पष्ट आला. दुसऱ्या लॅबमध्ये पुनर्तपासणी करण्यासाठी मुद्देमालाची मागणी पोलिसांनी केली आहे. मात्र, त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. पोलिसांनी तातडीने तपास करावा आणि पुरावे सांभाळून ठेवावेत, अशी मागणी पिळणकर यांच्या नातेवाइकांनी केली आहे.

Web Title : लापता पूर्व सरपंच पिलणकर मामला: एसआईटी जांच रुकी, सबूत खतरे में।

Web Summary : एसआईटी गठन के बाद भी लापता पूर्व सरपंच महेश पिलणकर की तलाश रुकी। पाटगाँव के पास लापता होने के दो महीने बाद जांच में देरी से महत्वपूर्ण सबूत खो सकते हैं। परिवार ने महत्वपूर्ण सबूतों को सुरक्षित रखने के लिए त्वरित कार्रवाई का आग्रह किया।

Web Title : Missing ex-Sarpanch Pilankar case: SIT investigation stalls, evidence at risk.

Web Summary : Weeks after forming an SIT, the search for missing ex-Sarpanch Mahesh Pilankar stalls. Key evidence may be lost as the investigation lags two months after his disappearance near Patgaon. Family urges swift action to preserve crucial evidence.