शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांची नोंद आता बंधनकारक

By admin | Updated: August 22, 2015 00:55 IST

शासनाचा आदेश : काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची सूचना

भीमगोंडा देसाई / कोल्हापूर विविध शासनाच्या योजनेंतर्गत सेवा, सुविधा, लाभ देणे सोपे व्हावे यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांना आता अपंगांची स्वतंत्र नोंद घेणे बंधनकारक केले आहे. नगरविकास विभागाचे उपसचिव ज. ना. पाटील यांनी २० आॅगस्टला असा आदेश दिला आहे. या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेत जन्म-मृत्यूप्रमाणेच अपंगांची नोंद काटेकोरपणे घ्यावी लागणार आहे. अपंगांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. त्यांना विशेष सेवा, सुविधा दिली जात आहे. सन १९९५च्या अपंग पुनर्वसन कायद्यानुसार अपंगांच्या कल्याणार्थ काही तरतुदी करण्यात आली आहे. त्यापैकी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमधील बजेटचा काही निधी अपंगांच्या कल्याणासाठी खर्च करणे आवश्यक आहे. दरम्यान, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्या कार्यक्षेत्रांत किती अपंग आहेत, याची नेमकेपणाने आकडेवारी नसते. परिणामी अपंगांचा राखीव निधी खर्च करण्यात अडचणी येतात. निधी शिल्लक पडतो. तो अन्य विकासकामांवर खर्च केला जातो. अपंग सेवा, लाभांपासून वंचित राहतात. त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य, गरीब व्यक्तीस बसत असतो. त्यामुळे शासनाने ४ आॅक्टोबर २०१३ रोजी आदेश काढून स्थानिक स्वराज्य संस्थांना अपंगांची नोंद घेण्याची सूचना दिली होती. मात्र, राज्यातील बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन सूचनेस केराची टोपली दाखवत अंमलबजावणी करत नव्हते. जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अपंगांना नोंदणीसाठी हेलपाटे मारावे लागतात, अशा सार्वत्रिक तक्रारी लोकप्रतिनिधींकडे आल्या. हे लोकप्रतिनिधींनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेऊन स्थानिक स्वराज्य प्रशासनाने अपंगांची नोंदणी स्वतंत्र रजिस्टरमध्ये घेण्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, त्याबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनाकडे द्यावा, अशा सक्त सूचना आदेशातून दिला आहे. अपंगांची नोंद घेणे टाळणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना या आदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक केले आहे. कोणती माहिती ? अपंगांची नोंदणी विहित नमुन्यातील अर्जाद्वारे घ्यावी लागणार आहे. नोंदणी तारीख, अपंगाचे पूर्ण नाव व पत्ता, त्याच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव, वय, स्त्री, पुरुष, कुटुंबातील सदस्यांची संख्या, शिक्षण, अपंगत्वाचा प्रकार, अपंगाचे प्रमाणपत्र व टक्केवारी, प्रमाणपत्र देणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांचे नाव, हुद्दा, शेती, आधारकार्ड क्रमांक, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेतला आहे का ?, घरकुल मिळाले आहे का, नोकरी, व्यवसाय अशी सविस्तर माहिती भरावी लागणार आहे.