शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी पाणंद रस्ते तालुक्यातील ६२ पैकी फक्त ६ गावांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:29 IST

( भाग - १ ) दत्ता बिडकर हातकणंगले : तालुक्यातील ६० पैकी फक्त ६ गावांमध्ये रोजगार हमी योजनेतून २ ...

( भाग - १ )

दत्ता बिडकर

हातकणंगले : तालुक्यातील ६० पैकी फक्त ६ गावांमध्ये रोजगार हमी योजनेतून २ कोटी ६० लाखांच्या पाणंद रस्त्याची कामे घेण्यात आली आहेत. तालुक्यातील इतर ५४ गावांचा समावेश का झाला नाही? यावरून वादंग सुरू झाला आहे. ६ गावांतील पाणंद रस्त्यांच्या कामावर मजुरांच्या यादीमध्ये चक्क जनावराचे डॉक्टर, इन्कम टॅक्सधारक, छोटे उद्योजक, ऐंशी वर्षांचे वृद्ध आणि स्वत:च्या शेतीवर कधीही काम केले नाही, अशा गृहिणींचा समावेश आहे. रोजगार सेवक, ग्रामसेवक, कंत्राटी अभियंते आणि या विभागाचे विस्तार अधिकारी यांच्या मिलिभगतने बोगस हजेरी पगारपत्रक तयार करून रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये लाखो रुपयांचा ढपला पाडला जात आहे.

तालुक्यातील रुकडी ७४ लाख ३२ हजार, माणगाव ७१ लाख ५२ हजार, हेरले २७ लाख ७२ हजार, चंदूर ३६ लाख २९ हजार, पट्ठणकोडोली १६ लाख २६ हजार आणि आतिग्रे ३६ लाख १६ हजार या सहा गावांमध्ये २ कोटी ६० लाखांचे पाणंद रस्ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून केले आहेत. ही पाणंद रस्त्यांची कामे पंचायत समिती सद्स्य, गावपातळीवरील कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने ुसुरू आहेत. शासनाचा हेतू बासनात गुंडाळून गावपातळीवरील ग्रा. पं. सद्स्य, सरपंच, पंचायत समिती सद्स्य यांनी रोजगार हमीच्या कामाच्या माध्यमातून स्वत:च्या तुंबडया भरण्यासाठी मजुरांना वेठीस धरले आहे. मजुरांच्या नावे बँक खात्यामध्ये रक्कम जमा होताच रोजगार सेवक चिरीमिरी देऊन मजुरांकडून जमा रकमा हातोहात लंपास करत आहेत.

गाव नकाशावर सरकारी पाणंद रस्ते ३३ फुटाचे आहेत. या रस्त्यावर दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून रस्ते १०-१२ फुटांवर आणून सोडले आहेत. पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणे काढली पाहिजेत; मगच पाणंद रस्ते रोजगार हमी योजनेतून करावे, असेही मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

कामावर न जाता पैसे

ज्या कामावर कधी गेलो नाही, जे काम आपण केले नाही, अशा कामाचे एक -दोन हजार मिळत असतील, तर का सोडा, अशी मानसिकता रोजगार हमीच्या हजेरी पगारपत्रकावर सह्या करणाऱ्या मजुरांची झाली असून, सरकारचे पैसे कोण काय खिशातून देतो काय, का कुणाला का सोडा, अशी गावपातळीवरील मजुरांची प्रतिक्रिया आहे.

फोटो = रोजगार हमी रस्त्याचे