शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित वेतनाबाबत यंत्रमागधारक अनभिज्ञ

By admin | Updated: September 1, 2015 22:48 IST

यंत्रमागधारक संघटनांचा प्रश्न : दहा हजार ५७३ रुपये किमान वेतन अस्तित्वात कसे आले; शासनाने हरकती, सूचना मागविल्या नसताना किमान वेतन जाहीर

इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी सुधारित किमान वेतन घोषित करण्यापूर्वी शासनाने त्यावर हरकती व सूचना मागविल्या नाहीत किंवा परिपत्रकाची सूचना दिली नसतानाही दहा हजार ५७३ रुपये किमान वेतन अस्तित्वात कसे आले, असा प्रश्न यंत्रमागधारक संघटनांना पडला आहे.गेले २९ वर्षे यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनाची फेररचना झाली नाही. म्हणून लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने सप्टेंबर २०१४ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी सुरू असताना शासनाने २९ जानेवारी २०१५ रोजी सुधारित किमान वेतन जाहीर केल्याचे न्यायालयात ३ फेब्रुवारी २०१५ ला सांगितले. त्यावर इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशन, सायझिंग असोसिएशन व अन्य संघटना यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती.या याचिकेची सुनावणी सुरू असताना सोमवारी (३१ आॅगस्ट) शासनाने नवीन सुधारित किमान वेतनाबाबत आपले म्हणणे मांडले आहे. मागील वर्षी म्हणजे २२ आॅक्टोबर २०१४ ला यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी सुधारित किमान वेतनाची सूचना जाहीर केली आणि त्यावर हरकती व सूचना मागविल्या. त्यामध्ये यंत्रमागधारकांच्या नऊ संघटनांनी, व्यक्तिगत ४६ व १५ कामगार संघटनांनी हरकती नोंदविल्या. दरम्यान, २३ सप्टेंबर २०१४ ला सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत किमान वेतन मंजूर करून ते पुढे शासनाकडे पाठविले. त्यानंतर शासनाने ९ जानेवारी २०१५ ला सुधारित किमान वेतन जाहीर केले, असे या म्हणण्यामध्ये शासनाने म्हटले आहे. मात्र, याबाबत कोणत्याही प्रकारची कल्पना यंत्रमागधारक संघटनांना मिळाली नव्हती, अशी माहिती पॉवरलूम असोसिएशनचे सतीश कोष्टी व पॉपलीन यंत्रमागधारक संघटनेचे सचिन हुक्किरे यांनी सांगितली. परिणामी, शासनाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या म्हणण्यामध्ये वरील हरकती, सूचना व बैठकांचा उल्लेख असल्याबद्दल यंत्रमागधारक संघटना मात्र चक्रावली आहे.अशा पार्श्वभूमीवर मंगळवारी इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशन, राष्ट्रवादी पॉवरलूम असोसिएशन, जिल्हा पॉवरलूम असोसिएशन, यंत्रमागधारक जागृती संघटना, पॉपलीन यंत्रमागधारक संघटना व तांबे माळ यंत्रमागधारक संघटनेचे प्रमुख सागर चाळके यांनी एक पत्र कामगारमंत्री प्रकाश मेहता व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठविले आहे. या पत्रामध्ये सायझिंग कारखान्यामध्ये कामगारांनी केलेल्या संपाचा आज ४३ वा दिवस आहे, अशा पार्श्वभूमीवर यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनाबाबत मंत्रालयात बोलविलेल्या बैठकीत तात्पुरता तोडगा काढून कारखाने सुरू करू नयेत. किमान वेतनास स्थगिती द्यावी आणि त्यातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी किमान वेतन पुनर्रचना समिती स्थापन करावी, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)नवीन किमान वेतनात ५३ टक्के वाढशासनाने जाहीर केलेल्या यंत्रमाग कामगारांच्या सुधारित किमान वेतनामध्ये ५३ टक्के वाढ झाली आहे. कुशल कामगारांसाठी जानेवारी २०१५ पूर्वीचा वेतन दर सहा हजार ९०० रुपये होता. तो आता दहा हजार ५७३ रुपये इतका झाला आहे. यामुळे इचलकरंजीतील यंत्रमागधारकांच्या कापडाचा दर वाढणार असल्याने अन्य यंत्रमाग क्षेत्राच्या तुलनेत येथील कापड महाग होईल. ज्यामुळे येथील यंत्रमाग कापडाला आवश्यक तो दर मिळाला नसल्याने यंत्रमाग कारखानदार व व्यापारी यांना नुकसान होणार आहे, असे म्हणणे शहर व परिसरातील यंत्रमागधारकांचे आहे.