शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

मुलींच्या शिक्षणासाठी ‘इलिशा’चे अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 20:43 IST

- संतोष मिठारी, कोल्हापूर./>मुलींचे शिक्षण आणि सुरक्षेबाबत प्रबोधन, जनजागृतीचे काम कोल्हापुरातील इलिशा मिलिंद धोंड ही युवती करत आहे. सामाजिक भान जपत तिने लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.सुखवस्तू कुटुंबातील इलिशा हिचे शालेय शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले. शिक्षण घेताना तिच्या लक्षात आले की, केवळ घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल ...

- संतोष मिठारी, कोल्हापूर.मुलींचे शिक्षण आणि सुरक्षेबाबत प्रबोधन, जनजागृतीचे काम कोल्हापुरातील इलिशा मिलिंद धोंड ही युवती करत आहे. सामाजिक भान जपत तिने लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.सुखवस्तू कुटुंबातील इलिशा हिचे शालेय शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले. शिक्षण घेताना तिच्या लक्षात आले की, केवळ घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने काही मुली या शिक्षणापासून वंचित राहत आहेत. ही गोष्ट तिने आपल्या वडिलांना सांगितली. त्यांच्या पाठबळावर तिने आपल्या शालेय जीवनापासून मुलींच्या शिक्षणाबाबत जागरुकता निर्माण करण्याचे पहिले पाऊल टाकले.

 

शाळांमध्ये जाऊन ती इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्त्व सांगू लागली. मुलींच्या घरी जाऊन पालकांचे ती प्रबोधन करू लागली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा विचार तिच्या मनात आला. तिने हा विचार आपले वडील आणि मित्र-मैत्रिणींसमोर मांडला. त्यातून गेल्या सहा वर्षांपूर्वी एनजीओ कम्पॅशन २४ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ५० मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचे पाऊल पडले. आज ही संख्या अडीच हजारांवर पोहोचली आहे. आजपर्यंत सुमारे दीड लाख मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शिक्षणाबाबतची जागरुकता निर्माण करण्यामध्ये ती यशस्वी ठरली. तिने सन २०१४ मध्ये ‘बेटी पढाओ’ या विषयावर ‘कम्पॅशन २४’ हा लघुपट तयार केला. स्वत:चे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयातून तिने या लघुपटाची निर्मिती केली. हा लघुपट आतापर्यंत एक कोटींहून अधिकजणांनी पाहिला आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘संवाद’ हा आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वातील या महत्त्वाच्या घटकाला अधिक विकसित करण्यासाठी पुण्यातील सिम्बॉयसिस संस्थेमध्ये मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशनचे सध्या ती शिक्षण घेत आहे. सामाजिक विषयांसह तरुणाईसाठीच्या विविध विषयांवरही ती लेखन करते. तिला प्रॉमिसिंग ब्लॉगरमधून गौरविण्यात आले आहे. फॅशन अँड फूड ब्लॉगिंगच्या क्षेत्रामध्ये सर्वांत कमी वयाची, अत्यंत वेधक लेखन करणारी लेखिका, अशी तिची ओळख आहे.मुलींवर होणारा अत्याचार आणि शोषणाविरोधात जागृती आणि प्रबोधनाचे काम तिने ‘विद्यार्थिनी सुरक्षा’ या मोहिमेंतर्गत गेल्या दोन महिन्यांपासून सुरू केले आहे. पुण्यातील ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांत जाऊन मार्शल आर्टस्, स्वरक्षण आदींबाबत ती आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत मार्गदर्शन करीत आहे. शिक्षणाबरोबरच मुलींची सुरक्षितताही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. यासाठी ती करीत असलेल्या कामाची व्याप्ती वाढावी, अशी तिची इच्छा आहे. एनजीओ कम्पॅशन २४ आणि वुई केअर या संस्थेमार्फत अडीच हजार मुलींना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्यात आले आहे. या संस्थेची संचालिका म्हणून इलिशा कार्यरत आहे. 

देशभरात घडलेल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने मी व्यथित झाले आहे. यावर मी विद्यार्थीनी सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. मुलींनी सुरक्षित, तर व्हावेच पण, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा स्वतंत्रपणे उमटावा; त्यासाठी आयुष्यभर काम करणार आहे. प्रत्येक मुलीने सामाजिक कार्यात योगदान द्यावे.- ईलिशा धोंड

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूर