‘अकरावी’च्या निवड यादीची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST2021-09-22T04:27:34+5:302021-09-22T04:27:34+5:30

केंद्रीय समितीने शुक्रवारपासून दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर गेल्या तीन दिवसांमध्ये एकूण ८३६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज दाखल ...

‘Eleventh’ selection process begins | ‘अकरावी’च्या निवड यादीची प्रक्रिया सुरू

‘अकरावी’च्या निवड यादीची प्रक्रिया सुरू

केंद्रीय समितीने शुक्रवारपासून दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर गेल्या तीन दिवसांमध्ये एकूण ८३६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्यात काहींनी नवीन अर्ज, तर काही विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये बदल केले आहेत. दाखल झालेल्या एकूण अर्जांपैकी विज्ञान विद्याशाखेचे ५२० अर्ज, वाणिज्य मराठीचे ११२, वाणिज्य इंग्रजीसाठी १६३, कला मराठी माध्यमासाठी ३५, तर कला इंग्रजी माध्यमासाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत. त्यांच्या छाननीची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली असून, निवड यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही यादी शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रसिद्ध केली जाणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी त्यादिवसापासून मंगळवार (दि. २८) पर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करायचे आहेत, अशी माहिती केंद्रीय समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी सांगितले.

Web Title: ‘Eleventh’ selection process begins