शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या सीमेवर इलेक्ट्रॉनिक तपासणी

By admin | Updated: July 27, 2014 22:59 IST

पृथ्वीराज चव्हाण : कऱ्हाड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन

कऱ्हाड : ‘परराज्यांना जोडणाऱ्या सीमांच्या ठिकाणी कर चुकवेगीरीला आळा घालण्यासाठी २२ इलेक्ट्रॉनिक तपासणी नाके राज्य शासन सुरू करणार आहे. त्यापैकी १३ नाक्यांचे काम पूर्ण झाले आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. कऱ्हाड येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार विक्रमसिंह पाटणकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, परिवहन विभागाचे प्रधान सचिव डॉ. शैलेशकुमार शर्मा, प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे उपस्थित होते.मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘कर व महसूल चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने कडक धोरण अवलंबले आहे. या धोरणानुसार परराज्यांच्या सीमांना जोडणाऱ्या रस्त्यांवर तपासणी नाके उभे करण्यात येणार आहेत. या नाक्यांवर वाहनांची तपासणी होईल. तसेच क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही हे तपासणी नाके लक्ष ठेवतील. विविध मार्गांवरील वाढते अपघात लक्षात घेता राज्यातील ३५ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणारा इलेक्ट्रॉनिक प्रशिक्षण विभाग सुरू करणार आहे.’ते पुढे म्हणाले की,‘ कायद्याने या विभागाला मान्यता नाही. मात्र, अपघातांसह त्यामध्ये ठार किंवा जखमी होणारे लोक यांचे प्रमाण अधिक असल्याने ते कमी करण्यासाठी कायद्यात बदल करून इलेक्ट्रॉनिक प्रशिक्षण विभागाला मान्यता देण्यात येणार आहे. त्यासाठी एखादी खासगी संस्था पुढे आल्यास त्यांनाही प्राधान्य देण्याचा राज्य शासन विचार करेल. प्रशासन गतिमान व लोकाभिमुख होण्यासाठी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नव्याने रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना दोन वर्षांचे प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणातून चांगले अधिकारी घडतील व त्यातूनच गतिमान प्रशासनाची निर्मिती होईल. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचाही समावेश करणार आहे. इतर विभागांप्रमाणेच परिवहन विभाग राज्याला महसूल मिळवून देणारा विभाग आहे. त्यामुळे या विभागामार्फत लोकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा देण्याचा राज्य शासन प्रयत्न करणार आहे.’यावेळी परिसरातील ग्रामस्थांसह विविध विभागांतील शासकीय अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)