शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढीविरोधात शुक्रवारी वीजबिलांची होळी

By admin | Updated: February 25, 2015 00:07 IST

इरिगेशन फेडरेशन आक्रमक : शेतकरी, उद्योजक होणार सहभागी

कोल्हापूर : वीज दरवाढ व वीज सवलत रद्द करण्याच्या ‘महावितरण’च्या निर्णयाविरोधात इरिगेशन फेडरेशनच्यावतीने शुक्रवारी ‘महावितरण’च्या ताराबाई येथील कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करणार असल्याची माहिती फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील व बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. महावितरण’चे सर्वच ग्राहकांसाठीचे दर हे शेजारीला राज्यापेक्षा दुप्पट आहेत. हे दर सर्वसामान्य माणसाला झेपणारे नाहीत. इतर राज्यांप्रमाणे विजेचे दर दोन वर्षे स्थिर ठेवणे गरजेचे आहे. शासन आता वैयक्तिक सोलर पंप ही योजना आणू पाहत आहे; पण ही योजना शेतकऱ्यांना परवडणारी नाही. त्याची देखभाल व दुरुस्ती ही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचा विषय आहे. यापेक्षा फिडरनिहाय अथवा गावनिहाय सोयीस्कर शेतकऱ्यांच्या गटासाठी १ ते ३ मेगावॅट क्षमतेचे सोलर प्रकल्प उभे करावेत, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. ‘महावितरण’ने कृषी पंपांबरोबरच अन्य ग्राहकांची वीज सवलत ताबडतोब सुरू करावी, सध्या असणारे वीज दर किमान दोन वर्षांसाठी स्थिर ठेवावेत; अन्यथा आंदोलन उभे करण्याचा इशारा पाटील यांनी दिला. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी दुपारी बारा वाजता ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व प्रताप होगाडे यांच्या उपस्थित ‘महावितरण’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर जिल्ह्यातील शेतीपंपधारक, उद्योजक वीज बिलांची होळी करणार आहेत. तरी जिल्ह्यातील शेतकरी, ग्राहक व उद्योजकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रकांत पाटील व बाबासाहेब पाटील यांनी केले. आर. जी. तांबे, सखाराम चव्हाण, आर. के. पाटील, एस. ए. कुलकर्णी, विक्रांत पाटील, महादेव सुतार, मारुती पाटील उपस्थित होते.