शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सरपंच निवडीचा ९ फेब्रुवारीला धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST

कोल्हापूर : येत्या ९ फेब्रुवारीला जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींत सरपंच, उपसरपंच निवडीचा धुरळा उडणार आहे. आरक्षण निश्चितीमुळे सरपंचपदाची घोषणेची औपचारिकता ...

कोल्हापूर : येत्या ९ फेब्रुवारीला जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींत सरपंच, उपसरपंच निवडीचा धुरळा उडणार आहे. आरक्षण निश्चितीमुळे सरपंचपदाची घोषणेची औपचारिकता राहिली असली तरी समसमान बलाबल, आरक्षित प्रवर्गाचा उमेदवार नसलेल्या गावात मात्र सत्ता स्थापनेवरून राजकारण पेटणार आहे. उपसरपंच पदासाठी गावामध्ये जोरदार फिल्डिंग लावल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जाहीर करीत पीठासीन अधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या जाहीर केल्या आहे. ग्रामपंचायतीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता ही निवड होणार आहे.

जिल्ह्यात निवडणूक जाहीर झालेल्या ४३३ पैकी ३८६ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. १४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. या सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी निवडणुकीनंतर २७ जानेवारीला आरक्षण काढण्यात आले. यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांनी अधिसूचना काढत सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडीच्या आधी सात दिवस नोटीस द्यावी लागते, त्याप्रमाणे ही नोटीस गावपातळीवर गेली असून, कृषी, महसूल, ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती पीठासीन अधिकारी म्हणून केली आहे.

चौकट ०१

या गावात सरपंच निवड नाही

गाडेगोंडवाडी, खाटांगळे, उपवडे, भामटे, अरळगुंडी, पट्टणकोडोली, येळाणे, कागणी, चिंचणे, घोसरवाड, राजापूरवाडी, येथे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झालेल्या प्रवर्गातील सदस्य नसल्यामुळे येथे सरपंचपदाची निवडणूक होणार नाही. उपसरपंचाची सर्वसंमतीने निवड करून आरक्षण बदलून नवीन सरपंच निवड होईपर्यंत उपसरपंचाकडे तात्पुरता कार्यभार दिला जाणार आहे.

चौकट ०२

उपसरपंचपदासाठी फिल्डिंग

निवडणुकीनंतर आरक्षण पडल्याने सर्वच प्रभाग सरपंचपदाचे आरक्षित असे समजून निवडणूक लढविली गेली. अनपेक्षित आरक्षण पडलेल्या ठिकाणी सरपंचपद राहिना निदान उपसरंपचपद तरी पदरात पाडून घ्यावे यासाठी सदस्यांनी नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने सव्वा वर्षाचा फॉर्म्युलाही निश्चित केला जात आहे.

चौकट ०३

वाठार तर्फ वडगाव, मजरेवाडी, किणे या गावात बहुमत एकाकडे आणि सरपंचपद विरोधकांकडे असे त्रांगडे तयार झाले आहे, तर उदगाव या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गड समसमान बलाबलमुळे राहतो, की कोसळतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. येथे सत्ता ठरविणाऱ्या एकमेव सदस्याची पळवापळवी सुरू आहे.

आरक्षण शिरोळ, राधानगरी, करवीर, गडहिंग्लज, आजरा, हातकणंगले, भुदरगड, गगनबावडा, पन्हाळा, कागल, शाहूवाडी, चंदगड

सर्वसाधारण ८ ५ १८ १७ ८ ६ १६ १ १७ १७ १२

सर्वसाधारण स्त्री ८ ८ १५ १४ ८ ६ ११ २ ९ १२ १२

नागरिकांचा मागास प्रवर्ग ५ २ ४ ५ ०२ २ ४ २ ७ १० ७

नागरिकांचा मागास वर्ग स्त्री ५ २ ५ ८ ६ ३ ७ २ २ ६ ४

अनुसूचित जाती ३ १ ४ २ २ १ २ ० ५ ५ ४

अनुसूचित जाती स्त्री ३ १ ७ ३ ० ३ ३ १ २ ३ २

अनुसूचित जमाती ० ० १ ० ० ० ० ० ० ० ०

अनुसूचित जमाती स्त्री १ ० ० १ ० ० ० ० ० ० ०

एकूण ३३ १९ ५४ ५० २६ २१ ४५ ०८ ४२ ५३ ४१