लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कागल येथील ठाकरे चौकात दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात वृद्ध जखमी झाले. गोविंद धोंडीबा जाधव (वय ६६, रा. कागल), असे त्यांचे नाव आहे. रविवारी रात्री हा अपघात घडला. त्यांच्यावर कागल प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना बुधवारी दुपारी सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.
कुत्रे आडवे आल्याने दुचाकीस्वार जखमी
कोल्हापूर : कुत्रे आडवे आल्याने भरधाव दुचाकीवरील ताबा सुटून घसरून पडल्याने एकनाथ भैरवनाथ वाघ (वय २६, रा. खोची, ता. हातकणंगले) हे जखमी झाले. खोचीहून कोल्हापूरला येताना सांगली फाटा येथे हा अपघात घडला. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एकोंडीच्या तरुणास मारहाण
कोल्हापूर : कागल रिंग रोडवर अज्ञाताने केलेल्या बेदम मारहाणीत तरुण जखमी झाला. इंद्रजित भानुदास बल्लाळ (रा. एकोंडी, ता. कागल), असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर सीपीआर रुग्णालयत उपचार सुरू आहेत.
दुचाकी चोरी
कोल्हापूर : येथील भवानी मंडपात पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. याबाबत राजाराम गजानन कुलकर्णी (रा. भवानी मंडप, मंगळवार पेठ) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.