महिलेच्या अंगावरील आठ तोळे सोन्याचे दागिने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 05:15 PM2020-09-01T17:15:11+5:302020-09-01T17:22:16+5:30

आमजाई व्हरवडे/राधानगरी : खिंडी व्हरवडे येथील महिलेच्या अंगावरील आठ तोळे सोन्याचे दागिने चोरून दुचाकीस्वार पळून गेले. आज भरदुपारी हा प्रकार घडला.

Eight weights of gold jewelry were looted from the woman's body | महिलेच्या अंगावरील आठ तोळे सोन्याचे दागिने लुटले

महिलेच्या अंगावरील आठ तोळे सोन्याचे दागिने लुटले

Next
ठळक मुद्देमहिलेच्या अंगावरील आठ तोळे सोन्याचे दागिने लंपासदिवसाढवळ्या चोरी, दुचाकीस्वारांचे पलायन

आमजाई व्हरवडे/राधानगरी : खिंडी व्हरवडे येथील महिलेच्या अंगावरील आठ तोळे सोन्याचे दागिने चोरून दुचाकीस्वार पळून गेले. आज भरदुपारी हा प्रकार घडला.

खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथील बेबीताई शामराव खांडेकर या साठ वर्षीय महिला आपल्या माहेरी राशिवडे खुर्द (ता. राधानगरी) येथे चालत जात होती. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी रस्यावर कोणी नसल्याचे पाहून त्या महिलेला शेजारी असणाऱ्या ऊसाच्या शेतात ओढत नेले आणि तिच्या अंगावरील चिताक, बोरमाळ आणि लक्ष्मीहार असा जवळपास आठ तोळे सोन्याचा ऐवज लुटून पसार झाले.

या महिलेने आरडाओरडा केल्याने शेजारून जाणाऱ्या लोकांच्या ही गोष्ट लक्षात आली. परंतु तोपर्यत ते दोन तरुण तेथून पसार झाले होते.

जवळपास चार लाखाचे सोने दिवसा ढवळ्या लुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात येत आहे.

Web Title: Eight weights of gold jewelry were looted from the woman's body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.