शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘हिल मॅरेथॉन’मध्ये धावणार आठ देशांचे धावपटू

By admin | Updated: June 12, 2015 00:44 IST

६ सप्टेंबरला आयोजन : चौथ्या एडिशनची साताऱ्यात घोषणा

सातारा : आंतरराष्ट्रीय संस्थेने प्रमाणित केलेली एकमेव ‘हिल मॅरेथॉन’ म्हणून लौकिक मिळविलेल्या सातारा हिल मॅरेथॉनमध्ये यंदा दि. ६ सप्टेंबर रोजी आठहून अधिक देशांचे रनर्स धावणार आहेत. हिल मॅरेथॉनच्या चौथ्या एडिशनची घोषणा बुधवारी रेस डिरेक्टर डॉ. संदीप काटे, अध्यक्ष चंद्रशेखर घोरपडे व अ‍ॅड. कमलेश पिसाळ आदींनी साताऱ्यात केली. याबाबतची अधिकृत घोषणा होताच जगभरातील धावपटूंनी यासाठी आपण उत्सुक असल्याच्या प्रतिक्रिया अवघ्या काही क्षणातच नोंदवायला सुरुवात केली.सातारा हिल मॅरेथॉनच्या चौथ्या एडिशनची घोषणा करताना डॉ. चंद्रशेखर घोरपडे व डॉ. संदीप काटे म्हणाले, ‘सातारकरांचा मानबिंदू ठरलेल्या या इव्हेंटला ‘खेळा आनंदासाठी’ असे ब्रीद असणाऱ्या पीएनबी मेटालाईफ यांचे प्रथमच सहकार्य लाभले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून चौथ्या एडिशनची तयारी सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आली. भारतातील किंबहुना जगातील ही एकमेव हिल (डोंगरी) प्रकारची असल्यामुळे रनर्सची लाडकी म्हणून मान्यता पावली आहे. यावेळी डीएसके ग्रुप आणि गोविंद मिल्क यांच्या सहप्रायोजकत्वाने सातारकरांना हातभार लागला आहे, असेही डॉ. घोरपडे म्हणाले. (प्रतिनिधी)सातारकरांसाठी विशेष कॅम्पचे आयोजनआंतरराष्ट्रीय धावपटूंबरोबरच सातारा शहर परिसरातील अनेक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. अनेकांना त्यांचे पूर्ण ज्ञान असत नाही. त्यासाठी येत्या रविवारी १४ रोजी सकाळी ९ वाजता वायसी कॉलेजमध्ये तज्ज्ञांचा विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. तर सातारकरांसाठी नोंदणी दिनांक येत्या १५ पर्यंत वाढविण्यात आल्याची विशेष सोय करण्यात आली आहे.