शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षितांनी श्रद्धा ठेवावी; पण डोळसपणे

By admin | Updated: November 30, 2014 23:57 IST

श्याम मानव : वैज्ञानिक दृष्टिकोन जपणे गरजेचे, चमत्काराच्या नावाखाली होते फसवणूक

कोल्हापूर : अध्यात्माचा आणि शब्दप्रामाण्याचा आधार घेऊन विविध बुवा-बाबांकडून सहजपणे लोकांची फसवणूक केली जाते़ विज्ञानाचे नियम ओलांडणारे कोणतेही अध्यात्म नाही़ अध्यात्माच्या नावाखाली सुशिक्षितानांही सहजपणे फसविले जात आहे़ त्यामुळे सुशिक्षितांनी श्रद्धा ठेवावी; पण ती डोळस असली पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आणि जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समितीचे राज्यस्तरीय सहअध्यक्ष प्रा़ श्याम मानव यांनी केले़ सामाजिक न्याय पुणे विभागांतर्गत कोल्हापूर जिल्हास्तरीय समितीने आयोजित केलेल्या ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणाविरोधी कायदा चमत्कार’ प्रात्यक्षिकांसह या जाहीर सभेत ते बोलत होते़ महावीर कॉलेज येथील आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवनमध्ये आज, रविवारी ही सभा झाली़ प्रा़ मानव म्हणाले, अध्यात्माला विज्ञानाचे कोणतेही नियम लागू नाहीत, हा पूर्वीपासून आपल्यावर होत आलेला संस्कार आहे़ पण जगाची गेल्या दोनशे वर्षांत जी प्रगती झाली आहे, तिचा आधार केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन आहे़ या दोनशे वर्षांत झालेली प्रगती यापूर्वीच्या हजारो वर्षांत झालेली नव्हती़ त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन जपणे गरजेचे आहे़ राज्यातील अनेक भागांत बुवा-बाबा चमत्कारांच्या नावाखाली सुशिक्षितांचीही फसवणूक करत आहेत़ त्यामुळे सुशिक्षितांनी श्रद्धा जरूर बाळगावी, पण आपण ज्यांच्यावर विश्वास दाखवतो, तो पुन:पुन्हा तपासून बघितला पाहिजे़ महाराष्ट्रात सातत्याने नरबळींच्या घटना घडतात याचा संदर्भ देत प्रा़ मानव म्हणाले, अलौकिक शक्ती, गुप्तधन, आणि अपत्यप्राप्ती यासाठी आजही नरबळी देण्याची अघोरी प्रथा घडत आहेत़ अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचे स्तोम माजले आहे़ या पार्श्वभूमीवर जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी, प्रसार करण्यासाठी समाजातील सर्व स्तरांनी सहभाग घ्यावा़ यावेळी मानव यांनी जादूटोणाविरोधी कायद्याचे वाचन केले तसेच या कायद्याचा भंग केल्यास होणाऱ्या शिक्षा सांगितल्या़ यावेळी प्रा़ मानव यांनी चमत्कारिक बुवा कशा प्रकारे हवेतून चेन, अंगठी काढून दाखवितात, उदबत्तीची दिशा आपल्याला हवी त्याप्रमाणे फिरवून व्यक्तीला संभ्रमात कसे टाकतात, याची प्रात्यक्षिकेही दाखवली़ तसेच बाबांच्या कारनाम्यालासुद्धा वैज्ञानिक आधार असतो हे सिद्ध करणारी विविध प्रात्यक्षिके दाखवली़ यावेळी जिल्ह्णातील विविध सरकारी कर्मचारी, संघटना आणि सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ या सभेचे उद्घाटन साहाय्यक समाजकल्याण आयुक्त विजयकुमार गायकवाड यांनी केले़ सुरेश झिरमुरे यांनी कायद्याच्या अंमलबजावणीची गरज मांडली़ यावेळी निवृत्त साहाय्यक समाजकल्याण आयुक्त बाबा पाटील, समन्वय शैला कुरणे आदी उपस्थित होते़. (प्रतिनिधी)