शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळ सभापतिपदी ‘शविआ’चे राजू हणबर

By admin | Updated: October 16, 2015 00:37 IST

इचलकरंजी नगरपालिका : सुवर्णमहोत्सवी वर्षात पहिल्यांदाच सत्ताबदल

इचलकरंजी : येथील नगरपालिका शिक्षण मंडळाच्या सभापतिपदाच्या निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीने बाजी मारली. सभापतिपदी राजू हणबर यांची बहुमताने निवड करण्यात आली. शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रथमच सत्ताबदल झाला. मंडळाच्या सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण अधिकारी सुभाष चौगुले होते.नगरपालिका शिक्षण मंडळाकडील कॉँग्रेसचे सभापती तौफिक मुजावर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या सभापतिपदासाठी जिल्हा शिक्षण अधिकारी चौगुले यांनी गुरुवारी निवडीची विशेष सभा आयोजित केली होती. अशा सभेच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसच्या सदस्यांत झालेली फूट व गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून केले जाणारे मतदान यामुळे या सभेविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. शहर विकास आघाडीने त्यांचे असलेले सदस्य पन्हाळा येथे सहलीला गेले होते, तर त्यांच्याबरोबर कॉँग्रेसचे रमेश कांबळे होते.गुरुवारच्या सभेसाठी शहर विकास आघाडीचे सहा व त्यांच्याबरोबर असलेले कॉँग्रेसचे कांबळे असे सात सदस्य फेटे बांधून सभेला आले. त्यानंतर कॉँग्रेसचे पाच सदस्य सभेमध्ये उपस्थित राहिले. या सभेसाठी गटशिक्षण अधिकारी भास्करराव बाबर हेही उपस्थित होते. शहर विकास आघाडीच्यावतीने राजू हणबर व कॉँग्रेसच्यावतीने अमरजित जाधव यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यावर झालेल्या मतदानात हणबर यांना आठ, तर जाधव यांना पाच मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी चौगुले यांनी हणबर सभापती म्हणून विजयी झाल्याचे घोषित केले. शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा केला. (प्रतिनिधी)चमत्कार घडविण्यात आमदारांना यश--हणबर यांची सभापती म्हणून निवड झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव म्हणाले, ५० वर्षांनंतर कॉँग्रेसकडून सत्ता काढून घेण्यात आमदार सुरेश हाळवणकर यांना यश मिळाले. त्यांनी चमत्कार घडवून आणला. त्यामुळे शिक्षण मंडळात ‘शविआ’ व कारंडे गटाची सत्ता स्थापित झाली. माजी सभापती तौफिक मुजावर म्हणाले, शिक्षण मंडळामध्ये कॉँग्रेस प्रभावीपणे विरोधी पक्षाची भूमिका बजावेल. सत्ताधाऱ्यांना पारदर्शी कामकाज करण्यास आम्ही भाग पाडू.