शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांचे कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:20 IST

* आतापर्यंत १६ हजार जणांचे घेतले स्वॅब संदीप बावचे : शिरोळ कोरोनामुळे चालती-बोलती अनेक माणसे कायमची निघून गेली. त्यामुळे ...

* आतापर्यंत १६ हजार जणांचे घेतले स्वॅब

संदीप बावचे : शिरोळ

कोरोनामुळे चालती-बोलती अनेक माणसे कायमची निघून गेली. त्यामुळे संसर्गाची भीती येथे प्रत्येकाला आहे. अशा भयग्रस्त परिस्थितीत पॉझिटिव्ह दृष्टी ठेवत तब्बल दहा कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. तब्बल सोळा हजार रुग्णांना प्रत्येक स्पर्श करत त्यांच्या नाकातोंडातून स्वॅब घेण्याचे काम केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून स्वॅब संकलन केंद्राच्या माध्यमातून हे कर्मचारी काम करीत आहेत.

एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात शिरोळ तालुक्यात वाढला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा सक्षम झाली. आगर, दानोळी, नांदणी, शिरोळ, दत्तवाड या पाच ठिकाणी स्वॅब संकलन केंद्रे सुरू करण्यात आली. तर नृसिंहवाडी, जयसिंगपूर, अब्दुललाट, घालवाड याठिकाणी अ‍ॅंटिजन तपासणी केली जात आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून रिझवान पटेल, गजानन पुकाळे, स्वाती बिरनाळे, रुपाली हासूरे, मनोज मेथे, आमणे हे सहाजण स्वॅब घेण्याच्या कामात व्यस्त आहेत. तर अ‍ॅंटिजन तपासणीसाठी भीम बोरगांवे, दीपाली शेटे, अमित काटकर व डोंगळे कार्यरत आहेत.

तालुक्यात जवळपास सोळा हजाराहून अधिक जणांचे स्वॅब आतापर्यंत घेण्यात आले आहेत. वेळीच तपासणी, निदान व उपचारामुळे अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. स्वॅब घेण्याचे कर्तव्य बजावणाऱ्यांना आपल्यामुळे कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी लागते. त्यामुळे हे कर्मचारी अगदी काळजीपूर्वक स्वॅब घेतात. कोरोनासारख्या भयग्रस्त परिस्थितीत पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून कोरोना योध्दा म्हणून काम करणारे हे कर्मचारी निश्चितच लढवय्ये ठरले आहेत. त्यांना आरोग्य विभागाचेही तितकेच बळ मिळत आहे.

-------------------------

कोट - शिरोळ तालुक्यात पाच ठिकाणी स्वॅब संकलन केंद्रे तर चार ठिकाणी अ‍ॅंटिजन तपासणी केली जात आहे. दहा कर्मचारी याठिकाणी सतत काम करीत आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. शासन नियमांचे पालन करावे.

- डॉ. प्रसाद दातार, तालुका वैद्यकीय अधिकारी