शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

वनघुबड, स्वर्गीय नर्तकमुळे पश्चिम घाटाचे सौंदर्य खुलले

By admin | Updated: December 19, 2014 00:11 IST

अभ्यास दौरा : ‘निसर्ग मित्र’च्या पाहणीत आढळले दुर्मीळ वनस्पती, पक्षी

कोल्हापूर : महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर असणाऱ्या दुर्मीळ जैवविविधतेमुळे या परिसराचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित झाले आहे. या जंगलात तपकिरी वनघुबड, तपकिरी शेपटीचा स्वर्गीय नर्तक (सुरंगी), मलबार पीट वायपर साप, खाजखुजली वनस्पती, अशा दुर्मीळ जैवविविधता आढळल्या. जागतिक पर्यावरण मासानिमित्त आणि ‘सह्याद्री वाचवा’ अभियानांतर्गत ‘निसर्ग मित्र’च्यावतीने दुर्मीळ जैवविविधतेच्या अभ्यास व नोंदीसाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता.या अभ्यास दौऱ्यात आजरा, तिलारी, चंदगड, चौर्ले यासह आसपासच्या जंगलांत पदभ्रमंती करून निसर्ग अभ्यास करण्यात आला. या अभ्यास दौऱ्यात अत्यंत दुर्मीळ असणारे केवळ आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, गोवा, कर्नाटक, केरळ परिसरात आढळणारे तपकिरी वनघुबड (ब्राऊन वूड आऊल), तसेच लांब शेपटीचा स्वर्गीय नर्तक सुरंगी (एशियन पॅराडाईज फ्लायक्चर) आणि मलबार पीट वायपर साप व झुबक्याने येणारी गोलाकार चपटी व तपकिरी रंगाची लव असणारी ही खाजखुजली वनस्पती (मक्युना मोनसपर्मा) या जाती आढळली. या अभ्यास दौऱ्यात अनेक दुर्मीळ वनौषधींसह पशू-पक्षी व प्राण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. हा अभ्यास दौरा डॉ. अशोक वाली, किशोर शिंदे, नितीन कारंजे, रियाज मुल्ला, अनिल चौगुले यांनी केला. (प्रतिनिधी)