शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘सीसीटीव्ही’मुळे जिल्ह्यात चेन स्नॅचिंगला आळा

By admin | Updated: December 30, 2016 01:01 IST

महिलाही झाल्या ‘अलर्ट’ : चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठी घट

गणेश शिंदे -- कोल्हापूर --गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात चेन स्नॅचर्सनी धुमाकूळ घातला होता. रहदारीच्या, गजबजलेल्या रस्त्यांवरही दिवसाढवळ्या घडणाऱ्या चेन स्नॅचिंगमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे पोलिस प्रशासनही चौफेर टीकेचे धनी बनले होते. त्यानंतर मात्र, पोलिसांनी समाजात विशेषत: महिलांमध्ये केलेली जनजागृती, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे पटवून दिलेले महत्त्व आणि काही सराईत चेन स्नॅचर्सच्या आवळलेल्या मुसक्या यामुळे २०१६ मध्ये २१ चेन स्नॅचिंगच्या घटनांत २०१५ च्या तुलनेत (६७ घटना) तब्बल २०० टक्क्यांनी घट झाली.सीसीटीव्ही परिणामकारक.शहरात सध्या १६६ सीसीटीव्ही क ॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे या सीसीटीव्हींची पोलिस प्रशासनाला गुन्हे उकल होण्याकामी मदत झाली. गडहिंग्लज, आजरा या शहरांतही सीसीटीव्ही बसविले आहेत. इचलकरंजीतही सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. नगरपालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर सीसीटीव्हीचा पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे. कोडोली (ता. पन्हाळा) ग्रामपंचायतीनेही सीसीटीव्ही बसविले आहेत.सराईत गुन्हेगार पोलिसांच्या नजरेतयंदा चेन स्नॅचिंगच्या घटना कमी घडल्या असल्या तरी सराईत गुन्हेगार पोलिसांच्या टेहळणीखाली आहेत. पण, यावर्षी या प्रकरणात किती संशयितांना अटक केली, याची माहिती पोलिस दप्तरी नोंद नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.यंदा चेन स्नॅचिंगच्या घटनांत घट झाली असली तरी महिलांनी अनावश्यक दागिने घालण्याचे टाळावे. जेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसतील, अशा ठिकाणी लवकर बसवावेत यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे. - प्रदीप देशपांडे, जिल्हा पोलिस अधीक्षक, कोल्हापूर.सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला खुनाचा गुन्हा...कोल्हापुरात २१ जून २०१६ रोजी शिवाजी पुलानजीक पाटील महाराज समाधिमंदिर परिसरात परप्रांतीय तरुणीचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांना या खुनाचा छडा लावताना शहरातील सीसीटीव्हीचा आधार घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हा गुन्हा उघडकीस आणला.