‘गोकूूळ’ची प्रारूप यादी दोन दिवसांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:23 IST2021-02-10T04:23:16+5:302021-02-10T04:23:16+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकूळ) प्रारूप यादी दोन दिवसांत प्रसिद्ध केली जाणार ...

Draft list of ‘Gokul’ in two days | ‘गोकूूळ’ची प्रारूप यादी दोन दिवसांत

‘गोकूूळ’ची प्रारूप यादी दोन दिवसांत

लाेकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकूळ) प्रारूप यादी दोन दिवसांत प्रसिद्ध केली जाणार आहे. सहकार निवडणूक प्राधिकरणाने तयारी केली असून आज, बुधवारी याबाबतची अधिसूचना काढण्याची शक्यता आहे. यामुळे निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

सहकारी संस्थाच्या निवडणुका गेली वर्षभर लांबणीवर टाकल्या होत्या. राज्य शासनाने निवडणुकांची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश सहकार प्राधिकरणाला दिले आहेत. त्यानुसार प्राधिकरणाने तयारी सुरू केली आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या ‘गोकूळ’मध्ये संस्था प्रतिनिधींच्या ठरावावर हरकती घेऊन त्याची सुनावणीची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता थेट प्रारूप यादीच प्रसिद्ध केली जाणार आहे. आज, मंगळवारी निवडणुकीबाबत अधिसूचना प्रसिद्ध करून दोन दिवसांत यादीही जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. प्राधिकरणाच्या पातळीवर ही तयारी सुरू आहे.

‘राजाराम’चा निकाल शुक्रवारी शक्य

कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्यांच्या अपात्र १३४६ सभासदांबाबत मंगळवारी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समोर अंतिम सुनावणी झाली. यामध्ये मंत्र्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले असून त्याचा निकाल शुक्रवारी देण्याची शक्यता आहे.

‘गोकूळ’याचिकेची हवा गेली

‘गोकूळ’ची निवडणूक वेळेत घ्यावी, यासाठी केर्ली (ता. करवीर) येथील जोर्तिंलिंग दूध संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज, बुधवारी अंतिम सुनावणी होती. मात्र, तोपर्यंत राज्य शासनाने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने या याचिकेची हवा गेली.

Web Title: Draft list of ‘Gokul’ in two days