शहरं
Join us  
Trending Stories
1
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
2
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
3
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
4
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
5
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
6
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
7
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
8
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
11
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
12
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
13
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
14
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
15
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
16
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
17
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
18
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
19
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
20
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

‘डीओटी’मध्ये लक्षणे नसलेल्या ६० रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील ‘डीओटी’ (डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी)मध्ये महानगरपालिका प्रशासनातर्फे सोमवार (दि. १२) पासून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात ...

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील ‘डीओटी’ (डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी)मध्ये महानगरपालिका प्रशासनातर्फे सोमवार (दि. १२) पासून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. तेथे सीपीआर व आयसोलेशन रुग्णालयातील कमी लक्षणे असलेल्या ६० रुग्णांना स्थलांतर करून उपचार सुरू केले. या सेंटरला जादा डॉक्टर्स, नर्स आणि रुग्णवाहिकेची गरज आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली असून रुग्णांवर उपचार कुठे आणि कसे उपचार करायचे, असा प्रश्न जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासनासमोर आहे. महानगरपालिका हद्दीतही रुग्णसंख्या वाढत असून त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने उचलली आहे. गतवर्षी कोविड महामारीच्या काळात तत्कालीन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी रातोरात शहराच्या विविध भागांत नऊ कोविड केअर सेंटर सुरू केली होती. त्याशिवाय संस्थात्मक अलगीकरण केंद्रेही सुरू केली होती. शिवाजी विद्यापीठातील डीओटी, वसतिगृहाची इमारत, लाईन बाजारजवळील अंडी उबवण केंद्र, शेंडा पार्क प्रशिक्षण केंद्राची इमारत अशी चार कोविड केअर सेंटर्स पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून त्यातील डीओटी सेंटर सोमवारपासून प्रत्यक्षात सुरू करण्यात आले. कमी लक्षणे असलेल्या सीपीआर रुग्णालयातील ४०, तर आयसोलेशन रुग्णालयातील २० कोविड रुग्णांना तेथे सोमवारी रात्रीपर्यंत स्थलांतर करण्यात आले. त्या ठिकाणी उपचारही सुरू करण्यात आले. सध्या नवीन कोविड रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे प्रशासनावरील ताण अजूनही कमी आहे. मात्र, पुढच्या काळात जर रुग्ण अधिकच संख्येने वाढले तर मात्र कोविड सेंटर्सची गरज भासणार आहे. त्यामुळे जशी गरज भासेल तशी कोविड केअर सेंटर्स सुरू करण्याचे नियोजन असल्याचे महापालिका उपायुक्त निखिल मोरे यांनी सांगितले.

चौकट

पाणी, स्वच्छतेची कमतरता

मंगळवारी डीओटी’मधील कोविड केअर सेंटला भेट दिली असता तेथे पिण्याच्या तसेच वापराच्या पाण्याची कमतरता तसेच स्वच्छतेचा अभाव असल्याचे दिसून आले. एक स्वतंत्र रुग्णवाहिकाही देण्यात आलेली नाही. त्या ठिकाणी सहा डॉक्टर्स व नर्स असून रुग्णांची संख्या वाढल्यास हा स्टाफ अपुरा पडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जादा स्टाफची व्यवस्था करायला पाहिजे. या केंद्रात रुग्णांचे जेवण, औषधे, तपासणी वेळेवर होत असल्याचे दिसून आले.

चौकट

डॉक्टर्स, नर्स नियुक्त्या सुरू

कोविड केअर सेंटर्स जशी सुरू होतील तशी तेथे आवश्यक डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय असा कर्मचारी वर्ग, कंत्राटी पद्धतीने नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या नेमणुकासुद्धा आवश्यकतेनुसार होत असल्याचे उपायुक्त मोरे यांनी सांगितले.