शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या सवलतीच्या साखरेवरही ‘जीएसटी’ कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:47 IST

कारखानदार संभ्रमात : साखर कारखान्यांना करावी लागणार कसरत

लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : सहकारी तत्त्वावर असणारे साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांना सवलतीच्या दरात साखर देतात. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार तीन रुपयांपासून अगदी १५ रुपयेप्रमाणे प्रतिकिलो ऊस उत्पादक सभासदांना सवलतीच्या दरात साखर देतात; पण जीएसटीच्या कराची अंमलबजावणी झाल्यापासून हा कर कोणी भरावा याबाबत चर्चा सुरू असून, सवलतीच्या साखरेवर गंडांतर येणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.महाराष्ट्रात १९६० नंतर सहकारी साखर कारखानदारीची झपाट्याने वाढ झाली. या उद्योगाची उभारणी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी समोर ठेवून सहकार सम्राटांनी आपली धोरणे राबविली. अगदी सहकारी साखर कारखाने स्थापनेपासून शेतकऱ्यांना अनेक सवलती देऊन ऊस लागवडीसाठी प्रोत्साहित केले. यातूनच या उद्योगातून निर्माण होणाऱ्या साखरेचाही ऊस उत्पादक शेतकरी हक्कदार असून, त्याला बाजारभावापेक्षा कमी दरात साखर देण्याचा कारखान्यांकडून स्तुत्य निर्णय घेतला होता. हा पायंडा आजही साखर कारखानदारांनी कायम ठेवला आहे. मात्र, या सवलतीच्या दरावर जीएसटी भरावी लागणार की बाजारपेठेत असणाऱ्या साखर दरावर भरायचा याबाबत निर्देश नसल्याने याबाबत गाईडलाईन कोणाकडून घ्यावयाचे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जीएसटीपूर्वी जरी ही साखर सवलतीने दिली, तरीही साखरेवर अबकारी कराच्या रूपाने प्रति क्विंटल १९५ रुपये भरावी लागत. मात्र, जीएसटी आकारला जात असल्याने सवलतीच्या साखर विक्री किमतीवरच जीएसटी घेणार की बाजारपेठेतील किमतीवर याचा गोंधळ निर्माण झाल्याने सवलतीची साखर देणे बंद केल्याने वादाचे प्रसंग होत आहेत.सवलतीच्या साखरेवर गंडांतर येऊ नये १ सरळ जीएसटी कर प्रणाली आल्याने आणि साखरेवर ५ टक्के जीएसटीमध्ये कर लावल्याने तो भरायचा कोणी यावर उलट-सुलट चर्चा सुरू असून, सवलतीच्या साखरेवर गंडांतर येऊ नये अशी माफक आशा ऊस उत्पादकांतून व्यक्त होत आहे. २ सध्या कुंभी कासारी ३ रुपये, वारणा २ रुपये, हमीदवाडा ७ रुपये, शाहू १२ रुपये, जवाहर ५ रुपये, राजाराम क। बावडा ५ रुपये, संताजी घोरपडे ११ ते १६ रुपये, विश्वास ५ रुपये प्रति किलो अशी सवलतीच्या दरात साखर शेतकऱ्यांना दिली जाते.