शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

दलाली मागणाऱ्या डॉक्टरला पकडले

By admin | Updated: November 28, 2014 00:06 IST

‘रेफरल चार्जेस’साठी कायपण!

सातारा : उपचारासाठी रुग्णाला दाखल केल्यानंतर खासगी डॉक्टरांकडे दलाली मागणाऱ्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याला सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सुधाकर रामकृष्ण भंडारे (वय ४२) असे डॉक्टराचे नाव असून, भुर्इंज येथे आज, गुरूवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत भुर्इंज प्राथमिक आरोग्य केंद्रात आपत्कलीन रुग्णवाहिका वैद्यकीय सेवेसाठी डॉ. सुधाकर भंडारे काम करीत होता. दि. २३ रोजी डॉ. भंडारेने १०८ या ‘टोल-फ्री’ सेवा असणाऱ्या रुग्णवाहिकेतून एक रुग्ण वाईतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला. त्यानंतर भंडारेने कमिशन (रेफरल चार्जेस) म्हणून एकूण वैद्यकीय बिलाच्या १५ टक्क्यांप्रमाणे १३ हजार ५०० रुपये लाचेची मागणी खासगी डॉक्टरकडे केली. खासगी डॉक्टरने याबाबत सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार गुरुवारी दुपारच्या सुमारास डॉ. भंडारेला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.भुर्इंज, ता. वाई येथील सदगुरूकृपा हॉस्पिटल या डॉ. भंडारेच्या खासगी रुग्णालयात पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)रेफरल चार्जेस’साठी कायपण!तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार शासनाच्या तत्काळ वैद्यकीय रुग्णसेवेतील काही डॉक्टर रुग्णाला रुग्णवाहिकेत घेतल्यानंतर तत्काळ तीन ते चार खासगी रुग्णालयांशी संपर्क साधतात. जास्तीत जास्त ‘रेफरल चार्जेस’ची आॅफर मिळेपर्यंत रुग्ण कितीही गंभीर असला तरी त्याला तसेच ताटकळत ठेवतात.