शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
3
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
4
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
5
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
6
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
7
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
8
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
9
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
10
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
11
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
12
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
14
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
15
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
16
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
17
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य मिळवायचे की, पोपटपंची करायची ?

By admin | Updated: December 9, 2014 23:51 IST

‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांपुढे पेच : नकारात्मक गुणपद्धती त्रासदायक; विद्यार्थ्यांचा मोर्चा काढून विरोध

संतोष मिठारी - कोल्हापूर -आयएएस, उपजिल्हाधिकारी, आदी अधिकारी पदांसाठी होणाऱ्या परीक्षांप्रमाणे राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) नकारात्मक गुणपद्धती लागू केली. मात्र, अधिकतर प्रात्यक्षिकांद्वारेच शिक्षण-प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ती त्रासदायक ठरत आहे. गेल्यावर्षी घेतलेल्या आयटीआयच्या परीक्षांचा निकाल दोन ते दहा टक्के लागला आहे. प्राचार्य, शिक्षकांनादेखील ही पद्धती नको आहे. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उद्योग-व्यवसायातील कौशल्य मिळवायचे की, लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी निव्वळ पोपटपंची करायची, असा प्रश्न राज्यातील सुमारे ५४६ ‘आयटीआय’मधील लाखो विद्यार्थ्यांसमोर आहे. कोल्हापुरात काल, सोमवारी त्याविरोधात विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून या पद्धतीस विरोध केला आहे.केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयांतर्गत असलेल्या रोजगार व प्रशिक्षण संचालनालयाने ‘आयटीआय’साठी गेल्यावर्षी सत्रपद्धतीने (सेमिस्टर) परीक्षा सुरू केली. त्याला विद्यार्थ्यांचा विरोध असतानाच त्या भरीस भर म्हणून गेल्या परीक्षेपासून नकारात्मक गुणपद्धती लागू केली. केंद्र सरकारच्या आयटीआय शिक्षणाबाबत धोरण तत्कालीन सरकारने महाराष्ट्रातही लागू केले. नकारात्मक गुणपद्धतीत चार प्रश्नांची उत्तरे चुकल्यानंतर एक गुण रद्द होतो. गुणवत्ता वाढावी या उद्देशान परीक्षेचे स्वरूप बदलले. मात्र,आयटीआयमध्ये विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण-प्रशिक्षण अधिकतर प्रात्यक्षिकांद्वारे दिले जाते. त्यामुळे याठिकाणी नकारात्मक गुणपद्धतीचा उलट परिणाम निकालावर झाला. कोल्हापुरातील ‘आयटीआय’मधून १५ अभ्यासक्रमांसाठी ३७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील अवघे ३७ जण उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरणारी ही पद्धती शिक्षकांनादेखील नको आहे. विद्यार्थी संघटनांकडून त्याविरोधात आंदोलन सुरू आहेत. त्याची दखल घेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने राज्यातील ‘आयटीआय’कडून नकारात्मक गुणपद्धतीची माहिती, कारणे मागविली आहेत. पहिल्यांदा नकारात्मक पद्धती रद्द करा व मातृभाषेतूनच परीक्षा घ्या, अशी माहिती आयटीआयच्या प्राचार्यांनी पाठविली आहे. केवळ १५ रुपयांत प्रशिक्षित करणारा राज्य शासनाचा आयटीआयचा उपक्रम आहे. त्यातून हजारो विद्यार्थी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहतात. पण, या परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांसह संस्थेसमोरही अस्तित्वाचीच प्रश्र्न उभा राहिला आहे. परीक्षा हिंदी, इंग्रजीत का ?दक्षिण भारतात तेलगू, कन्नड, मल्याळी आदी भाषा प्रदेशांनुसार आयटीआयमध्ये शिक्षण दिले जाते. शिवाय परीक्षादेखील घेतली जाते. मात्र, महाराष्ट्रात विविध अभ्यासक्रम मराठीमध्येच शिकविले जातात. मात्र, परीक्षा हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये घेतली जाते. महाराष्ट्राबाबतच अशी वागणूक का, असा सवाल विद्यार्थ्यांतून उपस्थित होत आहे.नकारात्मक गुणपद्धती त्रासदायक असल्याने ती बंद करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. या पद्धतीमुळे निकाल कमी लागल्याचे वास्तव आहे. हे वास्तव आणि विद्यार्थ्यांची मागणी संचालनालयाला कळविली आहे. विद्यार्थी हित हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.- दिनेश माने (प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर)स्वत:च्या पायावर उभे राहण्याच्या जिद्द असणारे, सर्वसामन्य कुटुंबातील मुले-मुली याठिकाणी प्रवेशित होतात. पण, सेमिस्टर,नकारात्मक गुणपद्धतीने त्यांच्या शिक्षणाला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे हे सर्व बंद करून पूर्वीप्रमाणे परीक्षा घ्यावी. त्यासाठी फेडरेशनच्या माध्यामातून आम्ही राज्यभर मोर्चाद्वारे लढा उभारला आहे. सांगलीत २० डिसेंबरला याप्रश्नी परिषद होईल. त्यात लढ्याची पुढील दिशा ठरविण्यात येईल. - दत्ता चव्हाण (राज्य सरचिटणीस, स्टुडंटस् फेडरेशन आॅफ इंडिया)