शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित बालके व क्षयग्रस्त रुग्णांना कोंबड्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST

आजरा आजरा तालुक्यातील कुपोषित बालके व क्षयरोग रुग्णांना अंड्यावरील कोंबड्यांचे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. ...

आजरा

आजरा तालुक्यातील कुपोषित बालके व क्षयरोग रुग्णांना अंड्यावरील कोंबड्यांचे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कोल्हापूर, आत्मा कोल्हापूर व जिल्हा कृषी विभाग कोल्हापूर यांच्यामार्फत आजरा तालुक्यातील १३४ कुपोषित व ६५ क्षयरोगग्रस्त रुग्णांना अंड्यावरील दहा कोंबड्या व एक कोंबडा शंभर टक्के अनुदानावर वाटप सुरू आहे. आज भादवण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५३ लाभार्थ्यांना याचे वाटप करण्यात आले.

मानवी आहारामधील अंड्याचे महत्त्व व कुपोषित बालकांच्या आहारामध्ये दररोज किमान दोन अंडी असणे आवश्यक आहे, असे पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी डॉ. पी.एम. जालकर यांनी सांगितले. क्षयग्रस्त रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहारात अंड्याचे महत्त्व आहे. कोंबड्यांमधील विविध आजार संगोपन व लसीकरण याबाबत डॉ. डी.ए. मुल्लांनी यांनी माहिती दिली.

कार्यक्रमास सभापती उदयराज पवार, उपसभापती वर्षा बागडी, जि.प. सदस्य उमेश आपटे, गटविकास अधिकारी बी.डी. वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे, बालविकास प्रकल्प अधिकारी नयना इंगोले, सुमन मोहिते, डॉ. ए.टी. पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ.पी. एम. जालकर यांनी आभार मानले.

जिल्ह्यात प्रथम आजरा तालुक्याची निवड

कुपोषित बालके, क्षयग्रस्त रुग्णांना १०० टक्के अनुदानावर कोंबड्यांच्या वाटपाची प्रक्रिया आजरा तालुक्यापासून केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यात आला. तालुक्यातील दोन्ही मिळून १९५ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

फोटो कॅप्शन - भादवण ( ता. आजरा ) येथे कुपोषित बालके क्षयग्रस्त रुग्णांना कोंबड्यांचे वाटप करताना डॉ. पी.एम. जालकर, शेजारी डाॅ. डी.ए. मुल्लांनी यासह अन्य.