मुरगूडमध्ये गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:17 IST2021-06-03T04:17:55+5:302021-06-03T04:17:55+5:30

कुबेर रियल इस्टेटचे मालक नवनाथ सातवेकर यांच्यावतीने सुमारे १०० गरजू लोकांना आठ दिवस पुरेल इतके जीवनावश्यक साहित्याचे किट देण्यात ...

Distribution of essential items to the needy in Murgud | मुरगूडमध्ये गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप

मुरगूडमध्ये गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप

कुबेर रियल इस्टेटचे मालक नवनाथ सातवेकर यांच्यावतीने सुमारे १०० गरजू लोकांना आठ दिवस पुरेल इतके जीवनावश्यक साहित्याचे किट देण्यात आले. शहरातील विविध प्रभागांत तरुणांनी त्या कुटुंबांच्या घरी जाऊन हे साहित्य वितरित केले. या वेळी मुरगूड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

या वस्तूंचे वाटप करण्यात आले, त्यावेळी सहा. पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे, दत्तात्रय मंडलिक, समाधान पोवार, अनिकेत नलवडे, राजू ढांगे, ओंकार म्हेतर, सूरज डेळेकर, संग्राम माडेकर, योगेश सारंग, किरण गुजर, समरजीत चव्हाण, प्रणव रामाणे, आर्थव चव्हाण, संतोष खंडागळे, रोहण चव्हाण आदी सहभागी झाले होते.

फोटो ओळ : मुरगूड शहरातील गरजू लोकांना साहित्य वितरित करताना पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल पाटील, अनिकेत नलवडे, समाधान पोवार, सूरज डेळेकर आदी.

Web Title: Distribution of essential items to the needy in Murgud