शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महानगरपालिकेत शिंदेसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी; मानसी लोळगेंऐवजी सत्यजित यांना ‘परिवहन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 11:37 IST

कोणाच्या तरी हट्टापायी आम्हाला हलक्यात घेऊ नका : फरास यांचा इशारा

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन समिती सभापतीपदावरून बहुमतात असलेल्या महायुतीमध्ये शुक्रवारी वादाची ठिणगी पडली. शिंदेसेनेचे नेते पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट निरोप देऊनदेखील ‘राष्ट्रवादी’च्या मानसी लोळगे यांचा अर्ज न भरता शिंदेसेनेने सत्यजित जाधव यांचा अर्ज दाखल केल्याने महायुतीत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले. लोळगे यांचा अर्ज न भरता आल्याने पक्षाचे गटनेते आदिल फरास संतप्त झाले. राष्ट्रवादीला हलक्यात घेऊ नका, असा सूचक इशाराच त्यांनी दिला.महापालिकेच्या स्थायी समिती, परिवहन समिती तसेच महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदासाठी शुक्रवारी दुपारी तीन ते पाच यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपचे विशाल शिराळे, तर परिहवन समिती सभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या मानसी लोळगे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची चर्चा झाली होती. परंतु, त्यावर शिक्कामोर्तब झालेले नव्हते. शुक्रवारी पालकमंत्री आबिटकर, मंत्री मुश्रीफ यांनी ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांना फोन करून स्थायीसाठी शिराळे यांच्याबरोबरच परिवहनसाठी लोळगे यांचा अर्ज भरावा, असा निरोप दिला.भाजप, शिंदेसेना, तसेच राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार, नगरसेवक निरोपाची वाट पाहत होते, परंतु निरोप काही मिळाला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास दहा मिनिटांचा अवधी असताना अर्ज भरायला या, असा निरोप राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास यांना देण्यात आला. पण, अर्ज कोणाचा भरायचा आहे, याची कल्पना दिली गेली नाही. फरास, लोळगे, नियाज खान महापालिकेत पोहचायला विलंब झाला. ते आले तेव्हा पाच वाजून दहा मिनिटे झाली होती. मुदत संपल्याने त्यांना अर्ज दाखल करता आला नाही, मात्र आधीच तयारीने आलेल्या शिंदेसेनेच्या गटनेते, नगरसेवकांनी सत्यजित जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.नगरसचिव कार्यालयात आदिल फरास, प्रा. जयंत पाटील यांच्यात काहीशा तणावात चर्चा झाली. तुम्ही यायला एवढा उशीर का लावलात, अशी विचारणा करत बिनविरोध निवडणूक होऊ नये, म्हणून वाट पाहून आम्ही जाधव यांचा अर्ज भरल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. नाराज होऊन फरास नगरसचिव कार्यालयातून तडक बाहेर पडले आणि महापालिका चौकात येऊन थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा ताणतणाव दिसत होता.कोणाच्या तरी हट्टापाई डावलले असेल, तर चुकीचेस्थायी समितीच्या सभापतीपदाचा अर्ज भरून महानगर अध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव खाली चौकात आले, तेव्हा दोघांनीही आदिल फरास यांच्याकडे जात तुम्ही यायला का वेळ केला, अशी विचारणा केली. संतप्त फरास यांनी घडलेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन मंत्र्यांनी सांगून देखील कोणाच्या तरी हट्टापायी आम्हाला डावलत असाल, तर ते चुकीचे आहे. राष्ट्रवादीला हलक्यात घेऊ नका, असा इशाराच फरास यांनी दिला. महेश जाधव यांनी एक वर्षाने काही फरक पडत नाही, पुढे संधी मिळेल, अशा शब्दांत समजावण्याचा प्रयत्न केला.

शिंदेसेना-राष्ट्रवादीत तणावशिंदेसेना आणि राष्ट्रवादी नगरसेवक यांच्यात अबोला राहिला. त्यामुळे महायुतीत अंतर्गत तणाव पाहायला मिळाला. आदिल फरास हे पत्रकार, तसेच भाजपचे पदाधिकारी यांच्याशी बोलत असताना, शिंदेसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख व त्यांचे काही नगरसेवक महापालिका चौकातून बाहेर पडले. फरास यांच्याशी कसालाही संवाद साधला नाही. शुक्रवारच्या वादाला देशमुख-फरास यांच्यातील वाढता तणाव कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

बिनविरोध होईल, म्हणून जाधव यांचा अर्जमानसी लोळगे या वेळेत आल्या नाहीत. मुदत संपत असताना, निवडणूक बिनविरोध होऊ नये, म्हणून आम्ही सत्यजित जाधव यांचा अर्ज भरला, असा खुलासा प्रा. जयंत पाटील यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Corporation: Shinde Sena-NCP Clash Over Transport Committee Post

Web Summary : Tensions flared in Kolhapur as Shinde Sena nominated Satyajit Jadhav for the Transport Committee, despite NCP's Manasi Lolge being favored. This sparked anger within the MahaYuti alliance, with NCP leaders warning against being underestimated, leading to strained relations.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती