शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: स्विकृत नगरसेवकपदावरून खडाजंगी; मोदी-देवकुळे यांच्यात वाद उफाळला, सुनील मोदी म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:22 IST

अन् तेच गुलाल लावून आले!

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदावरून उद्धवसेनेचे उत्तर विधानसभा मतदारसंघ प्रमुख विशाल देवकुळे यांनी शुक्रवारी निवडीनंतर माजी शहरप्रमुख सुनील मोदी यांच्या दारात जाऊन जाब विचारला. दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. उद्धवसेना कॉंग्रेसच्या दावणीला बांधला असून, पक्षात राहून कॉंग्रेसचे काम केल्याचा आरोप देवकुळे यांनी केला.देवकुळे हे प्रभाग क्रमांक १५ मधून महापालिकेसाठी इच्छुक होते. पण, जागा वाटपाच्या तडजोडीमध्ये जागा कॉंग्रेसला गेल्याने त्यांना आघाडीच्या नेत्यांसह तत्कालीन शहरप्रमुख सुनील मोदी यांनी सत्ता आल्यानंतर परिवहन सभापती पदाचा शब्द दिला होता. पण, महापालिकेत सत्ता थोडक्यात हुकल्याने सभापती पद नाही, तर स्वीकृत म्हणून संधी द्या, अशी मागणी देवकुळे यांनी कॉंग्रेस नेत्यांकडे केली होती. पण, कॉंग्रेसने देवकुळे ऐवजी मोदी यांना संधी दिली. शुक्रवारी स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी झाल्यानंतर मोदी गुलाल लावून घरी आले, तोपर्यंत देवकुळे, महेश उत्तुरे यांच्यासह पदाधिकारी मोदी यांच्या दारात आले. ‘मोदी बाहेर या, तुम्ही शिवसैनिकांचा घात केला’, असे जोरजोरात ओरडू लागले. मोदी बाहेर आल्यानंतर देवकुळे यांनी त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. महापालिका निवडणुकीत मला दिलेल्या शब्दाचे काय झाले?, असे विचारत निष्ठावंताचा घात केला. वाद वाढण्यापूर्वीच देवकुळे यांना शांत केले.या घटनेनंतर आमदार सतेज पाटील यांनी देवकुळे यांना फोन करून वर्षभर थांबण्याचा सल्ला दिला. पुढच्या वर्षी तुमचा विचार करतो, असे त्यांनी सांगितल्याचे समजते.अन् तेच गुलाल लावून आले!शुक्रवारी सकाळी स्वीकृतबाबत लागणारी सगळी कागदपत्रे गोळा करून ठेव, असा निरोप सुनील मोदी यांनी दिला. ‘तुमचे नाव घेतो, म्हणून मोदी सभागृहात गेले आणि तेच गुलाल’ लावून आल्याचे देवकुळे यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीत मला थांबवून शब्द दिला, त्याची पूर्तता करायला हवी होती. पण, सुनील मोदी यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी उद्धवसेनेला कॉंग्रेसच्या दावणीला बांधून निष्ठावंत शिवसैनिकांचा घात केला. याबाबत, आज शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्षनेतृत्वाकडे जाणार आहोत. - विशाल देवकुळे 

आमदार सतेज पाटील यांनी उद्धवसेनेला म्हणून मला पद दिले. इतरांनी अपेक्षा करणे चुकीचे नाही, विशाल देवकुळे यांची समजूत काढली असून, त्या विषयावर पडदा पडला आहे. - सुनील मोदी

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Politics: Dispute Over Council Seat; Modi and Devkule Clash

Web Summary : Uddhav Sena's Devkule confronted Modi over a council seat, alleging betrayal. Patil intervened, promising future consideration. Accusations of prioritizing Congress interests fueled the conflict.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे