शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

सरस्वती मार्केट, गांधी कॅम्पमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांत वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, मृतांचा आकडाही वाढत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, मृतांचा आकडाही वाढत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सरस्वती मार्केट व गांधी कॅम्पमधील एका तरुणासह दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त बनलेल्या नागरिकांनी भागातील व्यापार व भाजीपाला विक्री बंद पाडली. यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी व्यापारी व नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले व परिसर १५ मेपर्यंत बॅरिकेट्‌स लावून बंद करण्याचे आदेश दिले.

शहर व परिसरातील बाजारपेठेतील नागरिकांची वाढती गर्दी कोरोनावाढीला कारणीभूत ठरत आहे. पालिका व पोलीस प्रशासनकडून आवाहन करूनही नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे वाढती गर्दी प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. सरस्वती मार्केट व गांधी कॅम्पमध्ये खरेदीसाठी गर्दी होत असल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे बाजार बंद करण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. यातच भागातील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे स्थानिक नागरिक अधिकच आक्रमक बनले.

रविवारी सकाळी दहा वाजता भागातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांची दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. तसेच भाजीपाला विक्रेत्यांना तेथून हाकलून लावले. या प्रकारामुळे व्यापारी व नागरिकांत वाद निर्माण झाला. याची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष पोवार यांनी धाव घेत नागरिक व व्यापाऱ्यांना शांत केले. यावेळी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत १५ मेपर्यंत भागात सर्व व्यवहार व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सदा मलाबादे यांनी स्पीकरवरून नागरिकांना सूचना करत काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर नगरपालिकेने बॅरिकेट्‌स लावून भाग बंद केला.

फोटो ओळी

०९०५२०२१-आयसीएच-०१

सरस्वती मार्केट, गांधी कॅम्पमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांत वाद झाला. त्यावेळी उपनराध्यक्ष तानाजी पोवार यांनी परिसर १५ मेपर्यंत बॅरिकेट्‌स लावून बंद करण्याचे आदेश दिले.