शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांनीच काम अडविल्याची जनतेत चर्चा

By admin | Updated: August 22, 2014 22:47 IST

किल्ले रसाळगड : मंजुरी मिळूनही काम सुरू न झाल्याने शिवप्रेमी नाराज

खेड -- श्रीकांत चाळके --तालुक्यातील किल्ले रसाळगडावर जाण्यास शिवप्रेमींना मोकळीक मिळावी, यासाठी रसाळगडाच्या पायथ्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला २१ फेब्रुवारी २०१४ला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, पाच महिने उलटल्यानंतरही पायथ्यापर्यंतच्या रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे संबंधितांची चौकशी करावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. १० लाख रूपये खर्चाचे हे काम आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार रस्त्याचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप हे काम सुरू झाले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांनी ‘क’ वर्ग पर्यटन विकास या योजनेअंतर्गत घेरारसाळगड रस्ता आणि गोवळकोट येथील श्री देवी करंजेश्वरी मंदिर येथे स्वागत कमान उभारण्याच्या २४ लाख ९९ हजार रूपये खर्चाच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे. यापैकी घेरारसाळगड येथील रस्त्याचे बांधकाम करण्याच्या ९ लाख ९९ हजार रूपये खर्चाच्या कामाला मंजुरी दिली आहे. हे काम ८०० मीटर अंतराचे आहे.पायथ्यापर्यंत जाणारा हा रस्ता घेरारसाळगड गावातील पेठवाडी, तांबडवाडी, बौध्दवाडी व भुतराय धनगरवाडी या वाड्यांसाठीही जोडण्यात येणार आहे़ हा रस्ता वन विभागाच्या मालकीच्या जमिनीतून जाणार असल्याने वन विभागानेही त्याला मंजुरी दिली आहे. हे काम रत्नागिरी येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांच्या परवानगीनेच सुरू करण्यात येणार आहे़ आचारसंहितेपूर्वी हे काम सुरू होणे आवश्यक होते़ मात्र, प्रत्यक्षात या कामाला सुरूवात झालेली नाही. गडाच्या दुरूस्तीचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आजही ते अर्धवट स्थितीत असल्याने शिवप्रेमी नाराजी व्यक्त करीत आहेत. पुरातत्व आणि वन विभागाचे अधिकारी या कामाबाबत वेळकाढू धोरण स्वीकारत असल्याने याविषयी आजही संभ्रम असल्याचे शिवप्रेमींचे म्हणणे आहे. गडावरील ऐतिहासिक गोष्टींचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. घेरारसाळगड येथील रस्त्याचे बांधकाम करण्याच्या ९ लाख ९९ हजार रूपये इतका निधी मंजूर झाला आहे. गडाच्या पायथ्याशी जाणाऱ्या या रस्त्यामुळे घेरारसाळगड गावातील पेठवाडी, तांबडवाडी, बौध्दवाडी व भुतराय धनगरवाडी यांची गैरसोय दूर होणार आहे, अशी माहिती शिवप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी दिली. दरम्यान, हे काम रत्नागिरी येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांच्या परवानगीनेच सुरू करण्यात येणार असल्याने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हे काम सुरू होणे आवश्यक असल्याने तसे प्रयत्न करावेत, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे़