संभाजीनगरातून बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:23 IST2021-03-21T04:23:01+5:302021-03-21T04:23:01+5:30

कोल्हापूर : येथील संभाजीनगर परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीतील काकाज रेसिडन्सीमधील रहिवासी चंद्रकांत खंडू चिंचणे (वय ५६) हे गेली दोन महिने ...

Disappeared from Sambhajinagar | संभाजीनगरातून बेपत्ता

संभाजीनगरातून बेपत्ता

कोल्हापूर : येथील संभाजीनगर परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीतील काकाज रेसिडन्सीमधील रहिवासी चंद्रकांत खंडू चिंचणे (वय ५६) हे गेली दोन महिने बेपत्ता आहेत. मध्यम बांधा, गव्हाळ वर्ण, उंची साडेपाच फूट असे त्यांचे वर्णन असून, त्यांच्याविषयी काही माहिती मिळाल्यास जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबियांनी केले आहे.

२००३२०२१-कोल-चंद्रकांत चिंचणे-बेपत्ता

लिंगायत महिला संघटनेच्या अध्यक्षपदी मीनाक्षी माळी

निवडी जाहीर : विद्या माळी खजानिस

कोल्हापूर : वीरशैव लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा महिला संघटनेच्या अध्यक्षपदी मीनाक्षी मनोहर माळी व उपाध्यक्षपदी साधना बाजीराव माळी यांची निवड झाली.

नवीन कार्यकारिणी अशी : सचिव- डॉ. अरुणा माळी, खजानिस-विद्या गुरुबाळ माळी. नूतन संचालक मंडळ - सुलभा माळी, अंकिता माळी, शीला गोंधळी, शोभा शंभोजे, निर्मला माळी, अर्चना माळी, भारती माळी, उषा माळी, वंदना माळी, उषा माळी, इंदूताई माळी, वैशाली माळी, वनिता माळी, रूपाली माळी, आनंदी सीताराम चौगले, वैशाली बुबणे, रंजना माळी. नूतन पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष अशोक माळी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

फोटो : २००३२०२१-कोल- मीनाक्षी माळी-निवड

२००३२०२१-कोल-साधना बाजीराव माळी-निवड

२००३२०२१-कोल-विद्या माळी-निवड

२००३२०२१-कोल-अरुणा माळी-निवड

Web Title: Disappeared from Sambhajinagar