शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
5
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
6
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
7
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
8
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
9
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
10
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
11
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
12
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
13
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
14
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
15
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
16
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
17
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
18
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
19
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मेहनतीने साकारला दूध व्यवसाय

By admin | Updated: January 13, 2015 00:06 IST

८ गाई, ५० म्हशींचा प्रकल्प : शेगुणशी कुटुंब दररोज न्हाते दुधात

पहाटे पाचला सुरू झालेला त्यांचा दिवस रात्री नऊला संपतो. ८ गाई, ५० म्हशींसह घरातील सहा माणसांचे जणू एक कुटुंबच तयार झालंय. नूल (ता. गडहिंग्लज) येथील शेगुणशी कुटुंबात गोठा प्रकल्प राबवून दूध धंद्यात केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे कष्ट, व्याप पाहून ‘गोकुळ’ने त्यांना ‘मायक्रोट्रेनिंग सेंटर’ मंजूर करून दिले. गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यांतील दूध उत्पादकांचे जणू हे मार्गदर्शनाचे केंद्रच बनले आहे.
सुरेश मारुती शेगुणशी यांनी नूल येथे गोठा प्रकल्प उभा केला आहे. त्यासाठी महाराष्ट्र बँकेचे आठ लाखांचे कर्ज घेतले. वडील मारुती यांनी पाच म्हशींवर सुरू केलेल्या या दूध व्यवसायात आता ६० म्हशी आहेत. पहाटे चार ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जनावरांना चारा दिला जातो. पशुखाद्य, मिनरल मिक्सर, सोडा, मीठ, ऊस, मका, गाजरगवत, कडबा असे खाद्य असते. जनावरे दररोज एकवेळा, तर गोठा दोन वेळा स्वच्छ करतात.
मुऱ्हा, सांगोला, जाफराबादी जातींच्या म्हशी त्यांच्या गोठ्यात आहेत. स्वत: सुरेश, पत्नी सुरेखा, वडील मारुती, भाऊ सुभाष, भावजय कमल, आदींसह चार मुले या व्यवसायात कष्ट घेतात. सैन्य दलातून निवृत्त होऊन सुरेश या व्यवसायात स्थिरावलेत. दहावी पास असलेल्या सुरेखा यांची नॅशनल डेअरी डिव्हिजन बोर्डतर्फे ओरिसातील महिला शेतकऱ्यांना दूध धंद्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी निवड झाली होती.
या कुटुंबाची धडपड व कष्ट पाहून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)ने शेगुणशी डेअरी फार्मवर मायक्रोट्रेनिंग सेंटर सुरू केले आहे. दोन वर्षात २४५ दूध संस्थांमधील ९००० दूध उत्पादक जोडप्यांनी या सेंटरवर येऊन आदर्श दूध व्यवसाय व गोठा व्यवस्थापन प्रशिक्षण घेतले आहे.
नोकरदार व शेतकरी यांच्यातील राहणीमान, पैशांची बचत, वेळेचे नियोजन, जनावरांची निगा, गोठ्याची रचना, गोरण, पाणी-चारा व्यवस्थापन, औषधोपचार, मुक्तसंचार, स्वच्छता, जमा-खर्च, स्वच्छ दूध निर्मिती या विषयावर स्वत: सुरेश, सुरेखा मार्गदर्शन करतात. त्यासाठी मार्गदर्शन हॉलची रचना केली आहे.
‘गोकुळ’चे अरुणकुमार डोंगळे, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, असि. मॅनेजर एम. एस. चौगुले, शिवपार्वती सह. दूध संस्था यांनी त्यांना याकामी प्रोत्साहित केले.
- संजय थोरात ल्ल नूल


परदेशी शेतकऱ्यांच्या भेटी
शेगुणशी हे प्रतिदिन १७० लिटर दूध उत्पादन घेतात. महिन्याकाठी त्यांना ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. ‘गोकुळ’चा आदर्श गोठा व्यवस्थापनाचा जिल्हा स्तरावरील दोन वेळा पुरस्कार मिळाला आहे, तर शिवपार्वती दूध संस्थेत सलग
दहा वर्षे सर्वाधिक दूध संकलनाचे
बक्षीस मिळाले आहे. या सेंटरला अमेरिका व ब्राझील येथील शेतकऱ्यांनीही भेटी देऊन दूध व्यवसायाची सविस्तर माहिती घेतली आहे.

‘लय भारी’ तास.....
दूध धंदा हा महिलांवर अवलंबून असतो. कष्ट महिलेचे, दूध बिल मात्र पुरुषाच्या हाती, अशी अवस्था आहे. म्हणून येथील मायक्रोट्रेनिंग सेंटरवर दूध उत्पादक पती-पत्नीला प्रशिक्षण दिले जाते. त्यात पती-पत्नीने एकमेकांशी कसे बोलावे, वागावे, मुलांशी कसा संवाद साधावा, कामाचे नियोजन कसे करावे, याविषयी शेगुणशी मार्गदर्शन करतात. या तासाला ‘लय भारी’ असे नाव दिले आहे.