शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दिगंबर जैन समाजाचे दातृत्व आदर्शवत

By admin | Updated: May 11, 2015 01:06 IST

धनंजय महाडिक : जैन बोर्डिंगच्या नूतन इमारत, विविध दालनांचे उद्घाटन

कोल्हापूर : सरकारकडून निधी देऊनही अनेक प्रकल्प रखडतात; पण दिगंबर जैन समाजाच्या दातृत्वातून उभारलेली नूतन इमारत पाहून समाधान वाटते. या समाजाचे दातृत्व आदर्शवत ठरणारे आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी येथे केले. येथील दक्षिण भारत जैन सभेच्या दिगंबर जैन बोर्डिंगच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार महाडिक व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते इमारत व त्यातील विविध दालनांचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील होते. खासदार महाडिक म्हणाले, जैन बोर्डिंगने स्थापनेची १०८ वर्षे पूर्ण केली आहेत. बोर्डिंग हे कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा आहे. सरकारी निधी न घेता समाजाच्या दातृत्वातून उभारलेली अद्ययावत इमारत पाहून अभिमान वाटतो. दिगंबर जैन समाजाने या इमारत उभारण्याच्या उपक्रमातून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. बोर्डिंगच्या रस्त्याचा प्रलंबित असलेला प्रश्न सोडविला जाईल. आमदार क्षीरसागर म्हणाले, देश घडविण्याचे सामर्थ्य युवकांमध्ये आहे. अशा युवकांना शैक्षणिक, सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम बोर्डिंग करत आहे. सरकारची मदत न घेता जैन समाजाने इमारत उभारण्याची केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. बोर्डिंगमधील व्यायामशाळेसाठी आवश्यक ते साहित्य मी देईन. अध्यक्ष पाटील म्हणाले, दक्षिण भारत जैन सभेचे मुख्य काम शिक्षण, आरोग्य आणि संस्कार आहे. कोल्हापूरप्रमाणे जयसिंगपूर, इचलकरंजी आणि सांगली येथे अद्ययावत इमारतींची उभारणी व्हावी. समाजातील गरीब व हुशार विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशांअभावी थांबू नये म्हणून समाजाने शिष्यवृत्तीचा उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. या उपक्रमासाठी समाजाने आणखीन मदतीचा हात द्यावा. कार्यक्रमात सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष प्रा. डी. ए. पाटील यांनी बोर्डिंग व जैन सभेचा इतिहास व कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवक राजू लाटकर, किरण शिराळे, अपर्णा आडके, दक्षिण भारत जैन सभेचे उपाध्यक्ष रावसाहेब जि. पाटील, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, सहखजिनदार अ‍ॅड. ए. ए. नेमण्णावर, बोर्डिंगचे उपाध्यक्ष सुकुमार पाटील, सहसचिव सूर्यकांत पाटील, प्रफुल्ल चकमले, माधव उपाध्ये, सत्यजित पाटील, महावीर पाटील, राकेश निल्ले, आर. जे. पाटील, विलास बोगार, श्रीपाल जर्दे, कलगोंड पाटील, नितीन पाटील, आदी उपस्थित होते. बोर्डिंगचे सचिव सुरेश रोटे यांनी स्वागत केले. खजिनदार संजय शेटे यांनी प्रास्ताविक केले. राजकुमार चौगुले व पार्श्वनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. श्रेणिक पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)