शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे सर्व प्रश्न सोडवले, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 15:59 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरचे सर्व प्रश्न सोडवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाजनादेश यात्रेच्या दरम्यान कळंबा येथे झालेल्या सभेमध्ये टोलमुक्ती आणि अंबाबाई मंदिरासाठी निधी दिल्याचा उल्लेख करत फडणवीस यांनी हा दावा केला.

ठळक मुद्देकोल्हापूरचे सर्व प्रश्न सोडवले, देवेंद्र फडणवीस यांचा दावामहाजनादेश यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरचे सर्व प्रश्न सोडवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाजनादेश यात्रेच्या दरम्यान कळंबा येथे झालेल्या सभेमध्ये टोलमुक्ती आणि अंबाबाई मंदिरासाठी निधी दिल्याचा उल्लेख करत फडणवीस यांनी हा दावा केला.यात्रेच्यानिमित्ताने फडणवीस यांचे सोमवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाले होते.ढोल, ताशांचा गजर, महाजनादेश यात्रेचे विशेष गीत, सर्वत्र फडकणारे भाजपचे ध्वज आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हॉटेलमधून फडणवीस आणि चंद्रकांत पाटील बसवर आले. तेथून यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे होते.फडणवीस म्हणाले,चंद्रकांत पाटील आणि अमल महाडिक यांनी अनेक विकासकामे मंजूर करून आणली. कोल्हापुर आम्ही टोलमुक्त केले. अंबाबाईचा आराखडा मंजूर करून निधी दिला. एअर पोर्टवर भारतात कुठेही जाण्याची सोय केली. एवढेच नव्हे तर यापुढच्या काळात कोल्हापूरला पुराशी सामना करावाच लागू नये अशी उपाययोजना केली जाणार आहे.तत्पूर्वी स्टेशन रोडवरून अभिवादन करत निघालेली ही यात्रा दसरा चौकामध्ये आली. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दुचाकी घेऊन यात्रेत सहभागी झाले. दसरा चौकामध्ये तसेच बिंदू चौकामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. कॉमर्स कॉलेजसमोर रजनी मगदूम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तेथून उमा टॉकीजमार्गे गोखले कॉलेजच्या चौकामध्येही त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.हॉकी स्टेडियम परिसरातून जाताना माजी स्थायी सभापती विजय साळोखे आणि त्यांच्या हॉकी खेळाडूंनी हॉकी स्टीक उंचावत तर निर्माण चौकामध्ये महापालिकेतील भाजप गटनेते विजय सुर्यवंशी यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. संभाजीनगर चौकातील स्वागत स्वीकारून फडणवीस यांनी नागरिकांना अभिवादन करत थेट कळंबा गाठले. या ठिकाणी भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई यांनी फडणवीस यांचे स्वागत केले.विजय जाधव, अशोक देसाई, दिलीप मैत्रानी,सत्यजित कदम, अजित ठाणेकर, प्रताप कोंडेकर, शिवाजीराव बुवा, भारती जोशी,हेमंत आराध्ये, अ‍ॅड. संपतराव पवार, रासपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप कचरे यांच्यासह भाजप, ताराराणीचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर