शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

विकास नियंत्रण नियमावलीने विकासाचे मजले

By admin | Updated: November 21, 2015 00:40 IST

बांधकाम व्यावसायिकांतून स्वागत : मसुदा तयार करण्यात कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकांची मदत

कोल्हापूर : राज्य सरकारने ‘ड’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रात एकच विकास नियंत्रण नियमावली अंमलात आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील सर्वच ‘ड’ वर्ग महानगरपालिकाचा समतोल विकास होण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे कोल्हापुरात काही बांधकाम व्यावसायिकांतून स्वागत होत आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यास अजून सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. विशेष म्हणजे नियमावलीचा मसुदा तयार करण्यात कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकांची मोठी मदत झाली. राज्य सरकारने असा निर्णय घेण्यापूर्वी सध्या अस्तित्वात असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीत कोणते बदल करावेत, नवीन कोणते नियम असावेत याबाबत राज्य सरकारने एक अभ्यासगट स्थापन केला होता. या अभ्यास गटाचे सदस्य म्हणून महाराष्ट्र क्रिडाईतर्फे राजीव परिख, राम पुरोहित, गिरीष रायबागे तर आर्किटेक्ट कन्सल्टंट म्हणून नांदेडच्या वास्तुकला कन्सल्टंटची नियुक्ती करण्यात आली होती. या अभ्यास गटात नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश होता. समान विकास नियंत्रण नियमावलीचा कच्चा मसुदा या अभ्यास गटाने राज्य सरकारला सादर केला असून त्यावर हरकती व सूचना मागविल्या आहेत.नव्याने अंमलात येणाऱ्या समान विकास नियंत्रण नियमावलीमुळे राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिका क्षेत्रात समतोल विकास होण्यास मदत होणार आहे. महानगरपालिकांचे उत्पन्न वाढणार आहे. सर्वांना मान्य होतील अशा नियमांचा त्यामध्ये समावेश आहे. एकूणच या निर्णयामुळे विकासाला एकसारखी गती मिळणार असल्याचे अभ्यास गटाचे सदस्य राजीव परिख यांनी सांगितले. पुर्वी शहरात चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआाय) एक होता, तो आता १.३० इतका केला जाईल. २४ मीटर रूंदीच्या रस्त्यालगत असलेल्या चाळीस हजार चौरस फुटांच्या बांधकामांना १.३० इतका मूळ एफएसआय, टीडीआर तसेच प्रीमियम भरून .३० इतका एफएसआय घेता येईल. त्यामुळे इमारतीचा एफएसआय तीनपर्यंत जाणार आहे. जो पूर्वी १.८० इतकाच असायचा. या बदलामुळे रस्त्यांलगतच्या इमारती अकरा मजली होऊ शकतात. नव्या नियमावलीत इमारतींच्या भोवतालच्या सामासिक अंतरात बदल करण्यात आले आहेत. पार्किंगबाबतच्या नियमात वाढ करण्यात आली असून पाच टक्के पार्किंग सक्तीचे करण्यात आले आहे. वीस फ्लॅट असणाऱ्या गृहप्रकल्पांना तसेच हॉटेल, लॉजिंग व मंगल कार्यालये यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच सोलर वॉटर सिस्टीम सक्तीची करण्यात आली आहे. पूररेषेत यापूर्वी बांधकामांना परवानगी दिली जात नव्हती; परंतु यापुढे पूररेषेत काही अटींवर बांधकामाला परवानगी मिळणार आहे. जेथे पाणी येथे, तेथील पाणी पातळीपेक्षा दीड मीटर उंच बांधकाम करावे लागणार आहे. टीडीआर संबंधीचे धोरण एप्रिलमध्येच जाहीर करण्यात आले आहे. त्यावर सूचना व हरकती मागविल्या आहेत. यापूर्वी जेवढी जमीन दिली तेवढाच टीडीआर दिला जात असे परंतु आता दोन ते अडीच पट टीडीआर दिला जाईल. त्यामुळे आरक्षणातील जागा विकसीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर राज्यभरातून सूचना व हरकती मागविल्या जाणार आहेत. त्यानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. या सगळ्या प्रक्रियेला साधारण सहा ते आठ महिन्यांच्या कालावधी जाईल, असे परिख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)