शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

धनगरवाड्यावर विकासाचा बनाव

By admin | Updated: May 6, 2015 00:15 IST

पाण्याच्या योजनेवर राजकारणाचा वरवंटा : गावात येण्यासाठी पक्का रस्ता, अंतर्गत रस्ता, दिवाबत्तीची सोयच नाही

मच्छिंद्र मगदूम -सांगरुळ  उपवडे लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या पश्चिमेकडील डोंगराच्या माथ्यावर वसलेल्या मठाचा व मारुतीचा धनगरवाड्यावर विकासाचा बनाव सुरू आहे. दोन्ही वाड्यांवर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. पाण्याच्या योजना तीन वर्षे रखडल्याने आजही लोक पाण्यासाठी डोंगरात वणवण फिरत आहेत. गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवावेत, एवढीच मागणी येथील नागरिकांतून होत आहे.देशाला स्वातंत्र मिळून आज ६८ वर्षे उलटली, तरीही खेड्यापाड्यांत, डोेंगरदऱ्यांत वसलेल्या वाड्या-वस्त्यांवर विकास मात्र पोहोचला नाही, असेच हे विकासापासून वंचित राहिलेले दोन धनगरवाडे. आजही येथील लोकांना विकास म्हणजे काय? हे माहीत नाही. तीन वर्षांपूर्वी शतकोटी वृक्ष लागवड करण्यासाठी रस्ता करण्यात आला. त्यामुळे दोन वाड्यांवर जाण्यासाठी रस्ता झाला. संपूर्ण रस्ता डोंगरी भागात असल्याने पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने रस्ता तुटून गेला आहे. वृक्ष लागवडीचे काम पूर्ण झाल्याने याकडे कुणाचेच लक्ष नाही. धनगरवाड्यावर चारचाकी वाहन घेऊन जायचे झाल्यास जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.दरम्यान, येथील लोकांची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या पाण्याची मागणी लक्षात घेऊन नेत्यांनी व प्रशासनाने यासाठी निधी मंजूर करून दिला; पण त्याचे कामही ठेकेदाराच्या मर्जीनेच चालले आहे. काम सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली, तरी त्याचे पाणी अद्यापही येथील लोकांना मिळालेले नाही. मठाच्या धनगरवाड्यावर विहिरीत मोटार बसविली आहे. साठवणुकीसाठी टाकीही बांधली आहे. ठेकेदाराने बिलेही उचलली आहेत; पण पाण्याचा पत्ताच नाही. निव्वळ राजकीय द्वेषापोटी पाण्याची योजना सुरू केलेली नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र मेटाकुटीस आला आहे.मारुतीच्या धनगरवाड्याचीही परिस्थिती काय वेगळी नाही. वाड्यावरची पाण्याची योजना सुरू केली आहे. मात्र, ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो, त्या विहिरीत बराच कचरा असून, पाण्याला दुर्गंधी येते. त्यामुळे तेथील नागरिक ते पाणी पिण्यासाठी वापरत नाहीत. आजही येथील लोक पिण्याच्या पाण्यासाठी झऱ्याचाच आधार घेतात. ग्रामपंचायतीने विहिरीतील संपूर्ण पाणी काढून गाळ व कचरा काढून धनगरवाड्याला स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आहे.पाण्यासाठी डोंगरात वणवणवसलेल्या मठाचा व मारुतीचा धनगरवाड्यावर ग्रामपंचायतीचे दुर्लक्षकित्येक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवावेत, एवढीच मागणीपाण्याच्या योजना तीन वर्षे रखडल्याने आजही लोक पाण्यासाठी डोंगरात वणवण फिरतात. धनगरवाड्यावर पाण्याची योजना तातडीने सुरू करावी. तसेच अंतर्गत रस्ते करून दिवाबत्तीची सोय करावी. - संभाजी आडूळकर(ग्रामस्थ, मठाचा धनगरवाडा)ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो, ती विहीर स्वच्छ करावी. वाड्यावरील विजेचे खांब सडले आहेत. ते पडण्याच्या स्थितीत आहेत. जीवितहानी होण्यापूर्वी ते खांब बदलावेत. - आंबुबाई मिसाळ (ग्रामपंचायत सदस्या)