घरफोडी व चोरीप्रकरणी एक अल्पवयीन ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST2021-09-03T04:26:04+5:302021-09-03T04:26:04+5:30

इचलकरंजी : शहरात पेट्रोलिंग करत असताना विना नंबर प्लेट मोपेडवरून फिरणाऱ्या एका अल्पवयीन मुलास शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने ...

Detention of a minor in burglary and theft case | घरफोडी व चोरीप्रकरणी एक अल्पवयीन ताब्यात

घरफोडी व चोरीप्रकरणी एक अल्पवयीन ताब्यात

इचलकरंजी : शहरात पेट्रोलिंग करत असताना विना नंबर प्लेट मोपेडवरून फिरणाऱ्या एका अल्पवयीन मुलास शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने घरफोडी व मोटारसायकलची चोरी केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी मोपेड व रोख रक्कम असा एकूण ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आवाडे अपार्टमेंट परिसरात बुधवारी (दि.१) शिवजीनगरचे गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत होते. या वेळी हनुमान मंदिराच्या पाठीमागील रोडवर एक अल्पवयीन विना नंबर प्लेट मोपेडवरून फिरताना आढळला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मोपेड शेळके मळा परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच वखार भाग परिसरातील सुपर ऑटो नावाचे दुकान फोडून दुकानातील लोखंडी तिजोरी उघडून १५ हजार रुपयांची चोरी केल्याचीही कबुली दिली.

Web Title: Detention of a minor in burglary and theft case