Kolhapur News: दारू महागल्याने देशीला पसंती; बीअर अन् वाइनचीही विक्री वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 18:24 IST2026-05-15T18:23:49+5:302026-05-15T18:24:30+5:30

विदेशीच्या मागणीत सहा टक्के घट, देशीच्या विक्रीत सात टक्के वाढ

Demand for country liquor increased by seven percent in Kolhapur district in the last year | Kolhapur News: दारू महागल्याने देशीला पसंती; बीअर अन् वाइनचीही विक्री वाढली

Kolhapur News: दारू महागल्याने देशीला पसंती; बीअर अन् वाइनचीही विक्री वाढली

उद्धव गोडसे 

कोल्हापूर : जून २०२५ पासून विदेशी दारूच्या विक्री दरात आठ ते २० टक्क्यांची वाढ झाली. दरवाढीमुळे खिशावरील भार वाढल्याने मद्यपींनी विदेशीऐवजी देशी दारूला पसंती दिल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात देशी दारूची मागणी सात टक्क्यांनी वाढली असून, विदेशी दारूच्या विक्रीत सहा टक्क्यांनी घट झाली. व्हिस्की, रम, व्होडका, ब्रँडी या तुलनेत स्वस्त असलेली बीअर आणि वाइनला मागणी वाढल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
दरवाढीचा भार थेट खिशावर पडत असल्याने काही मद्यपींनी पसंती क्रम बदलले आहेत.

महागड्या विदेशीऐवजी देशी किंवा तुलनेने स्वस्त असलेली बीअर आणि वाइनला पसंती दिली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यांत विदेशी दारूच्या विक्रीत सहा टक्क्यांची घट झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

विदेशी दारूचा ग्राहक अन्य पर्यायांकडे वळल्याने देशी दारूच्या विक्रीत सात टक्के वाढ झाली. तसेच बीअरच्या विक्रीत १५ टक्के, तर वाइनच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विदेशीऐवजी देशी आणि बीअर, वाइनमधून राज्याचा महसूल वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र मेडची विक्री वाढली

विदेशी दारूमध्ये महाराष्ट्र मेड लिकर (एमएमएल) हा नवीन प्रकार राज्य सरकारने गेल्या वर्षापासून सुरू केला आहे. याला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. एका वर्षाच्या आतच याची विक्री एकूण विक्रीमध्ये तब्बल ४० टक्क्यांवर गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

देशी, विदेशी दारूची विक्री (लिटर)

वर्ष - देशी - विदेशी

२०२४-२५ - १ कोटी ६ लाख ६१ हजार २०५ - १ कोटी ३ लाख १२ हजार ३४७
२०२५-२६ - १ कोटी १४ लाख ६ हजार १६८ - ९६ लाख ९९ हजार ४५४


बीअर, वाइनची विक्री (लिटर)

वर्ष -  बीअर -  वाइन

२०२४-२५ - ७० लाख ९७ हजार ७८० - ३ लाख २४ हजार ५२३
२०२५-२६ - ८१ लाख ६७ हजार ५२१ - ४ लाख १६ हजार ५३५

दरवाढीमुळे बनावट दारूची निर्मिती, तस्करी आणि अवैध विक्री होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. गैरप्रकार सुरू असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी द्याव्यात. - स्नेहलता नरवणे - अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

Web Title : कोल्हापुर: शराब की कीमतों में वृद्धि से देशी शराब को प्राथमिकता

Web Summary : कोल्हापुर में विदेशी शराब की कीमतों में वृद्धि के कारण देशी शराब की बिक्री में 7% की वृद्धि हुई और विदेशी शराब की बिक्री में 6% की गिरावट आई। बीयर और वाइन की बिक्री में भी क्रमशः 15% और 28% की वृद्धि हुई, महाराष्ट्र निर्मित शराब लोकप्रिय हो रही है।

Web Title : Kolhapur: Liquor Price Hike Drives Preference for Country Liquor

Web Summary : Foreign liquor price hikes in Kolhapur led to a 7% rise in country liquor sales and a 6% drop in foreign liquor sales. Beer and wine sales also increased by 15% and 28% respectively, with Maharashtra-made liquor gaining popularity.