इचलकरंजी : येथील दाट लोकवस्ती असलेल्या एका भागात दारूच्या नशेत स्वत:च्या मुलांना मारहाण करत अमानुष छळ करणाऱ्या पित्याच्या तावडीतून एक मुलगा व दोन मुलींची सुटका करण्यात आली. या मुलांना कोल्हापुरातील बालकल्याण संकुलात दाखल केले आहे. कर्नाटकातून कामानिमित्त इचलकरंजीत येऊन राहणाऱ्या कुटुंबातील संबंधित मुलांच्या आईचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. आईचे छत्र हरपल्याने त्यांची परवड सुरू झाली. दारूच्या आहारी गेलेल्या पित्याकडून मुलांना दररोज मारहाण व अमानुष छळ सुरू झाला. पोटाची भूक भागविण्याची अडचण असताना वरून मार सहन करावा लागत होता. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मारहाणीचा प्रकार सुरू असताना परिसरातील नागरिकांनी सतर्कता दाखवत मुलांची नशेतील बापाच्या तावडीतून सुटका केली. त्यांना गावभाग पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर चाईल्ड लाईन संस्थेला माहिती दिली. त्यांनी मुलांना बालकल्याण संकुलात दाखल केले.
मद्यपी पित्याच्या तावडीतून मुलांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST
इचलकरंजी : येथील दाट लोकवस्ती असलेल्या एका भागात दारूच्या नशेत स्वत:च्या मुलांना मारहाण करत अमानुष छळ करणाऱ्या पित्याच्या ...
मद्यपी पित्याच्या तावडीतून मुलांची सुटका
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}