शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

गुंठेवारीची प्रकरणे तातडीने निकालात काढण्याचा निर्णय

By admin | Updated: December 11, 2014 00:02 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : ३१ मार्चपर्यंत प्रकरणांचा निपटारा करणार

इचलकरंजी : मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागातील गुंठेवारीची प्रकरणे महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ कायद्यानुसार विहीत करून निकालात काढण्याचा निर्णय आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ग्रामीण भागातील गुंठेवारी नियमानुसार करताना मोजणीबाबत खासगी अभियंत्यांची मदत घेता येईल का, याबाबत तपासणी करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.इचलकरंजी व परिसरातील गुंठेवारी प्रकरणे गेल्या तीन-चार वर्षांपासून नियोजन प्राधिकारी यांना मुदतवाढ न दिल्याच्या तांत्रिक कारणावरून प्रलंबित आहेत. त्यामुळे हाळवणकर यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यावर खडसे यांनी जिल्हाधिकारी यांना प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी बैठक बोलावली. बैठकीस शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार वर्षा शिंगण-पाटील, आदी उपस्थित होते.बैठकीत गुंठेवारी प्रकरणात अर्जदार भूखंडाच्या मालकीचा किंवा कायदेशीर कब्जाबाबतचा कागदोपत्री पुरावा, विद्यमान आखणीबाबतचा आराखडा, बांधकामाचा आराखडा, दुरुस्ती आराखडा, आदी आवश्यक कागदपत्रांसहीत अर्ज केल्यानंतर गुंठेवारी प्रमाणपत्र देण्यात यावे, असे प्रांताधिकारी यांना कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी मान्य केले. तसेच पालिका क्षेत्रातील वर्ग १ व २ च्या जमिनींची यादी घेऊन त्याप्रमाणे तपासणी करावी व प्रत्येक प्रकरण पुन्हा तहसीलदार यांच्याकडे वर्ग करण्यासाठी लागणारा विलंब टाळावा, अशा सूचनाही देण्याचे ठरले.ग्रामीण भागातील मोजणीची जाचक अट रद्द करण्याची मागणी हाळवणकर यांनी केली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत शासनाकडून स्पष्ट सूचना मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे हाळवणकर यांनी खासगी अभियंता नेमून आराखडे तपासून घेण्याबाबत कार्यवाही करावी, अशी सूचना केली. ग्रामीण गुंठेवारीच्याा प्रलंबित प्रकरणांच्या जलद निर्गतीबाबत उपविभागीय व तहसील स्तरावर शिबिराचे आयोजन करून अशा प्रकरणांचा निपटारा ३१ मार्च २०१५ पर्यंत करण्याच्यादृष्टीने शिबिराचे आयोजन करावे, अशी मागणीही त्यांनी केली. (प्रतिनिधी)