शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपासून सरसकट दुकाने उघडण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 18:07 IST

corona virus Kolhapur : येत्या सोमवारपासून (दि. ५) राजारामपुरी परिसर आणि शहरातील सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्धार राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत शनिवारी झाला. राजारामपुरीतील जनता बझार चौकात ही कोपरा सभा झाली. दुकाने सुरू केल्यानंतर कारवाई करण्यासाठी येणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही देण्यात आला. महाराष्ट्र चेंबर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी अध्यक्षस्थानी होते.

ठळक मुद्देराजारामपुरी व्यापारी असोसिएशनचा निर्णय कारवाईस जशास तसे उत्तर देण्याची तयारी

कोल्हापूर : येत्या सोमवारपासून (दि. ५) राजारामपुरी परिसर आणि शहरातील सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्धार राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत शनिवारी झाला. राजारामपुरीतील जनता बझार चौकात ही कोपरा सभा झाली. दुकाने सुरू केल्यानंतर कारवाई करण्यासाठी येणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही देण्यात आला. महाराष्ट्र चेंबर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी अध्यक्षस्थानी होते.गांधी म्हणाले, सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. तीन महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू, सेवांची दुकाने वगळता इतर दुकाने बंद आहेत. त्याचा फटका संबंधित दुकानदार, व्यावसायिकांना बसत आहे. आर्थिक समस्या निर्माण झाल्याने दुकानदारांची सहनशीलता संपली आहे. दुकाने बंद असल्याने कामगारांचे पगार, बँकेचे हप्ते, सरकारी कर भरणे व्यापाऱ्यांना अडचणीचे झाले आहे. यामुळे आम्ही चार दिवसांपूर्वी सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला होता; पण जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनुसार आम्ही दोन दिवस थांबलो. आता कोणाशी चर्चा करणार नाही. सोमवारपासून ९ ते ४ वेळेत सर्व दुकाने उघडतील.

  • रक्षा राऊत म्हणाल्या, गेल्या मार्च महिन्यात नव्याने व्यवसाय सुरू केला; पण लॉकडाऊन झाल्याने प्रचंड अडचणी निर्माण झाल्या. कर्मचाऱ्यांना पगार कसे द्यायचे? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामुळे सरकारने सहनशीलतेचा अंत न पाहता दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी.
  • विनोद कटारिया म्हणाले, आता फार दिवस दुकाने बंद ठेवणे दुकानदारांना शक्य नाही. लॉकडाऊनमुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
  • माणिक पाटील चुयेकर म्हणाले, दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी, ज्यामुळे ग्राहकांची गर्दी होणार नाही.
  • श्याम बासरानी म्हणाले, सरकार दंडुकशाहीचा वापर करत विविध घटकांकडून दंड वसूल करीत आहेत. त्या दंडातील रक्कम बेरोजगारांना भत्ता म्हणून द्यावा.
  • रणजित पारेख म्हणाले, दीर्घकाळ दुकाने बंद राहिल्याने मालाचा साठा खराब होत आहे. दुकानदार अडचणीत आले आहेत. त्यांचे विविध प्रकारचे कर थकले आहेत. बँकांच्या कर्जाचा हप्ता कसा भरायचा, असा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे.
  • अनिल पिंजानी यांनी दुकाने सुरू करण्यावर सर्वांनी ठाम राहावे, असे आवाहन केले. 

या वेळी नीतेश जैन, भरत रावत, अमित लोंढे, आयुष हंजे यांच्यासह व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर