भुयारी गटार मुदतवाढीसंदर्भात लवाद नेमण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:24 IST2021-01-20T04:24:13+5:302021-01-20T04:24:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सभेमध्ये घेण्यात आलेल्या चारही विषयांना मंजुरी मिळाली. भुयारी गटार ...

भुयारी गटार मुदतवाढीसंदर्भात लवाद नेमण्याचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सभेमध्ये घेण्यात आलेल्या चारही विषयांना मंजुरी मिळाली. भुयारी गटार कामाच्या मुदतवाढीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लवाद नेमण्याच्या विषयावर सुमारे दीड तास चर्चा रंगली.
ही विशेष सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. यावेळी ऑफलाइन सभा घेण्यावरून सुरुवातीलाच विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये वादावादी झाली. जिल्ह्यामध्ये अन्य नगरपालिका व जिल्हा परिषद यांची सभा ऑफलाइन होत असून, केवळ इचलकरंजी नगरपालिकेची सभा ऑनलाइन का, असा सवाल नगरसेवक शशांक बावचकर यांनी केला. नगर परिषदेच्या वाढीव कबनूर व शहापूर भागासाठी मंजूर भुयारी गटार कामाच्या मुदतवाढीसंदर्भात ठेकेदार केआयपीएल व्हिस्टाकोअर इन्फ्रा प्रोजेक्ट जे.व्ही. व नगर परिषद यांच्यामधील वाद सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने लवादाची नेमणूक करा, असे सांगितले होते. या विषयावर नगरसेवकांनी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने १५ दिवसांची मुदत दिली होती. यावर नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी निर्णय देण्यास वेळ केला असल्याचे बावचकर यांना सांगितले. अखेर या विषयावर लवाद नेमून निविदा काढण्याचे सभेमध्ये ठरले.